Header AD

काँग्रेस किसान कमिटी जिल्हाध्यक्ष पदावर कल्पेश जाधव यांची नियुक्ती
भिवंडी , प्रतिनिधी  :  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या किसान काँग्रेस कमिटीच्या ठाणे जिल्हाअध्यक्षपदी कल्पेश (बाळू) जाधव ह्यांची निवड करण्यात आली कल्पेश जाधव हे अंबाडी येथील असून गेली १५ वर्षे काँग्रेस पक्षात सक्रिय असून त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी कामे आणि आंदोलने केली आहेत त्यामुळे  याच कामाची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. माझ्यावर दिलेल्या जबाबदारी नुसार पदाला न्याय देत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करून पक्षाला बळ देण्याची जबाबदारी पार पाडणार असल्याचे यावेळी कल्पेश (बाळू) जाधव यांनी सांगितले.


या निवडीच्या अध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र कार्यक्रम मंत्री बाळासाहेब थोरात ह्यांच्या शासकीय निवास्थानी  मलबार हिल येथील रॉयलस्टोन येथे मोहनजी जोशी, आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, अविनाशजी लाड उपमहापौर नवीमुंबई ह्यांच्य उपस्थितीत  परागजी पष्टे, किसान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नेतृत्वाखाली हा नियुक्ती सोहळा पार पडला.
काँग्रेस किसान कमिटी जिल्हाध्यक्ष पदावर कल्पेश जाधव यांची नियुक्ती  काँग्रेस किसान कमिटी जिल्हाध्यक्ष पदावर कल्पेश जाधव यांची नियुक्ती Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads