राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा
ठाणे , प्रतिनिधी : सालाबादप्रमाणे राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा करण्यात येतो ह्या संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर सुनील खांबे हे हा सामाजिक कार्यक्रम राबवत असतात त्या कार्यक्रमाचे नियोजन दिवंगत राष्ट्रपाल सुनिल खांबे हे करत होते पण जुलै महिन्यात त्यांचे दुःखद निधन झाले त्यामुळे खांबे परिवारावर खूप मोठे दुःख झाले होते.
पण हे दुःख न घेता आपण राष्ट्रपाल ह्यांच्या स्मरणार्थ हा संविधान सन्मान गौरव दिन अनुर्षा सुनील खांबे यांच्या माध्यमातून करण्याचे ठरवले असे सुनील खांबे म्हणाले.ठाणे स्टेशनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला ह्या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर सुनील खांबे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सर्वांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
ह्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनपठावर गायक सेजुळे आणि संच यांनी अनेक गीते गायली कर्मवीर सुनील खांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की आज आपल्याला मिळतो तो मान सन्मान , फक्त भारतीय संविधानामुळे व डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्यामुळे संविधान जपणे व संविधान दिन साजरा करणे ही आपल्या प्रत्येक भारतियांची जबाबदारी आहे असे खांबे म्हणाले .
ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते, संदीप खांबे , प्रमोद खांबे यांनी केले त्या प्रसंगी ,महिंद्रा भालेराव, प्रशांत बनसोडे, संतोष सोनावणे ,मिलिंद खांबे, अनिरुद्ध खांबे, प्रेरणा गवई,रवी शंकर,रफीक मर्चंट, अतिश सोनावळे, लाड गायकवाड आदी महिला ,पुरुष, तरुण वर्ग सोशल डिस्ट्नस ठेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment