Header AD

शिवसेना जनसंपर्क कार्यालय व संकेश रघुनाथ भोईर यांच्या वतीने किल्ले स्पर्धा व रांगोळी स्पर्धा


   डोंबिवली , शंकर जाधव : प्रभाग क्रमांक २७ चिकनघर गावठाण मधील नागरिकांसाठी दीपावलीच्या निमित्ताने शिवसेना जनसंपर्क कार्यालय व संकेश रघुनाथ भोईर यांच्या वतीने किल्ले स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्ससिंग आणि इतर बाबीची पूर्तता करत सदर स्पर्धा राबवण्यात आल्या. दोन्ही स्पर्धांसाठी विभागातील जनतेचा भरघोस प्रतिसाद लाभला. शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करत संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमासाठी विभागातील शिवसैनिक तसेच ज्येष्ठ नागरिक मान्यवर म्हणून लाभले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी युवासेना तसेच विभागातील शिवप्रेमी मित्र मंडळ, महालक्ष्मी महिला मंडळ,आर्यन मित्र मंडळ,बाल कलाकार मित्र मंडळ, दत्तासेवा मित्र मंडळ व महिला मंडळ,आर.बी.ग्रुप तसेच शिवसेना कल्याण शहर शाखेचे विशेष सहकार्य लाभले. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण नामवंत रंगावली चित्रकार राजेश पवार यांनी केले तर हेगडे सर यांनी किल्ले स्पर्धा परीक्षणासाठी मोलाचे सहकार्य केले. संकेश रघुनाथ भोईर यांनी समाजाप्रती असलेल्या जबाबजारीचे भान ठेवून सदर कार्यक्रम समाप्त केला.किल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक जितेश पाटील आणि सहकारी-  सुवर्ण दुर्ग किल्ला ( दापोली तालुक ), दुसरा क्रमांक ओम मेमाणे आणि सहकारी -तोरणा किल्ला, तिसरा क्रमांक तृतीय क्रमांक नितेश पडवळ – प्रतापगड किल्ला या विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले.तर काल्पनिक रांगोळी स्पर्धेत पहिला क्रमांक वंदना रमाळकर – दुसरा क्रमांक प्रमाली पाटील तिसरा क्रमांक मधुरा जाधव, ठिपके रांगोळी स्पर्धेत पहिला क्रमांक पुष्पा खेडेकर, दुसरा क्रमांक सुवर्णा पानसरे, संस्कार भारती रांगोळी स्पर्धेत शुभांगी खेडेकर, दुसरा क्रमांक भाविका पुजारी, तिसरा क्रमांक निकिता पाटील या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

शिवसेना जनसंपर्क कार्यालय व संकेश रघुनाथ भोईर यांच्या वतीने किल्ले स्पर्धा व रांगोळी स्पर्धा शिवसेना जनसंपर्क कार्यालय व संकेश रघुनाथ भोईर यांच्या वतीने किल्ले स्पर्धा व रांगोळी स्पर्धा Reviewed by News1 Marathi on November 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads