Header AD

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर तर आरपीआयचा उपमहापौर निवडुन येईल केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

 मुंबई , प्रतिनिधी  :  आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सोबत आरपीआय युती करेल. भाजप आरपीआय च्या युतीचा मुंबई  महापालिकेत विजय नक्की होईल त्यात भाजपचा महापौर तर आरपीआय चा उपमहापौर निवडून येईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी आज व्यक्त केला.

 

आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी  भाजप आणि शिवसेना आपआपल्या पद्धतीने कार्यरत झाले आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना असा  प्रमुख सामना मुंबई महापालिका निवडणुकीत होणार असुन त्यात आरपीआय ची भीमशक्ती ज्यांच्या बाजूने त्यांचा विजय निश्चित असल्याने रिपब्लिकन पक्ष भाजपला समर्थन देणार आहे. त्यासाठी लवकरच आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची  भेट घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीची व्यूहरचना ठरविणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर तर आरपीआयचा उपमहापौर निवडुन येईल केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर तर आरपीआयचा उपमहापौर निवडुन येईल  केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on November 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads