आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या हस्ते प्रशांत माळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोरोना काळातील मदतकार्याचे पुस्तकही केले प्रकाशित
कल्याण : एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक असलेले आणि नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रशांत माळी यांच्या जनसेवा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन व कोरोना काळातील प्रशांत माळी यांनी केलेल्या समाजकार्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते पार पडला. यावेळी विधान परिषद आमदार जगन्नाथ शिदें, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हा अध्यक्ष रमेश हनुमंते आदिंसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीछे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकनेते एकनाथ खडसे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी नक्कीच सन्मान करेल असे सांगत राजेश टोपे यांनी माळी यांना पुढील वाटचालिस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment