मोबाईल स्नॅचिंग करणारी टोळी कोनगाव पोलिसांकडून अटक
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यातील राजणोली नाका येथे एस टी बसची वाट पाहत उभे असलेल्या प्रवाशाच्या हातातून जबरीने मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघा आरोपींना कोनगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे .महामार्गावर मोबाईल सँचिंग च्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिक कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी आपल्या पोलीस पथकास या भागात विशेष गस्त लावून या चोरट्यांचा मागोवा काढण्यास सुरवात केली असता सपोनि नितीन सूर्यवंशी ,अभिजित पाटील ,सहाय्यक पो उप निरी सूर्यवंशी ,पोहवा नलावडे,किरण पाटील ,पोना मासरे, कृष्णा महाले ,अविनाश पाटील, गणेश चोरगे ,देवरे या पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने रिजावन अब्दुल मातीनं अन्सारी (२० ) ,फिरोज सलाउद्दीन शेख (१९ अशा दोन आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल व एक दुचाकी असा ६५९९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे
भिवंडी शहर व विशेषतः महंर्गालागतच्या ग्रामीण भागात दुचाकी वरून मोबाईल हिसकवणार्या टोळ्या कार्यरत असून या बाबत विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून नुकताच भिवंडी गुन्हे शाखेने सुद्दा मोबाईल स्नाचीनच्या नऊ गुन्हे उघडकीस आनंत तीन जणांना ताब्यात घेतल्याची घटना ताजी असताना कोनगाव पोलिसांनी सुद्दा मोबाईल स्नाचीग करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्याने असे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांच्या गुन्ह्यांस जरब बसली आहे .
मोबाईल स्नॅचिंग करणारी टोळी कोनगाव पोलिसांकडून अटक
Reviewed by News1 Marathi
on
November 30, 2020
Rating:

Post a Comment