Header AD

लातूरचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह चार जणांचा अपघातात मृत्यू
बीड ,  प्रतिनिधी   :  वंचित बहुजन आघाडीचे लातूरचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचे आज सकाळी अपघाती निधन झाले. लातूरहुन औरंगाबादकडे जात असतानाहा अपघात झाला. समोरून येणाऱ्या टॅंकरला कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की गाडीची पुढील बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली. यावेळी गाडीतील वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व त्यांचे नातेवाईक सुभाष भिंगे तसेच महादेव चकटे, व्‍यंकटी गडदे यांचा या अपघातात मृत्यू झाला तर राम भिंगे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


आज सकाळी सदाशिव भिंगे हे लातूरहुन औरंगाबाद कडे जात असताना गेवराई जवळ पावणे नऊ वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला. रस्ता सोडून गाडीने समोरून येणाऱ्या टँकरला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच बीडचे वंचितचे प्राध्यापक शिवराज बांगर, गेवराईचे तालुकाध्यक्ष सुभाष सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली. आज संविधान दिनी देशात जल्लोष असताना वंचितचा एक धडाडीचा कार्यकर्ता अशाप्रकारे काळाच्या पडद्याआड होणे हे अत्यंत दुःखदायक घटना आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना वंचित तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

लातूरचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह चार जणांचा अपघातात मृत्यू लातूरचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह चार जणांचा अपघातात मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

क्विक हिलने आर्थिक वर्ष २०२१ मध्ये मजबूत वृद्धी नोंदवली

मुंबई, १८ मे २०२१ :  क्विक हिल टेक्नोलॉजीज लिमिटेड (क्विक हिल), भारतातील ग्राहक, बिझनेस, सरकारसाठी सायबर सिक्युरिटी आणि डेटा प्रोटेक्शन सोल्...

Post AD

home ads