प्रा.रमाकांत यादव यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाचे भाष्यकार हरपले केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई , प्रतिनिधी : रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते; आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाचे साक्षीदार व्यक्तिमत्व; कोकणचे सुपुत्र; बौद्धजन पंचायत समितीचे माजी सभापती; रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष प्रा. रमाकांत यादव यांचे आज दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाचे भाष्यकार हरपले आहेत अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत प्रा.रमाकांत यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रा. रमाकांत यादव यांनी आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान दिले. त्यांचे आज कोरोना ने निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे. अशी शोकभावना ना. रामदास आठवले यांनी वक्त केली आहे.
प्रा. रमाकांत यादव हे सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य होते. इतिहासाचे तज्ञ प्राध्यापक होते.ते मुंबईत चारकोप कांदिवलीत वास्तव्यास होते. येत्या दि. 24 नोव्हेम्बर रोजी रिपब्लिकन पक्षातर्फे दिवंगत प्रा. रमाकांत यादव यांना आदरांजली वाहणारी जाहीर आदरांजली सभा रिपब्लिकन पक्षातर्फे गोराई येथील हॉटेल बेव्ह्यू च्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.

Post a Comment