भाजपा कळवा मंडळाच्या वतीने विज बिल होळी आंदोलन
कळवा , अशोक घाग : भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारच्या गलथान कारभाराने सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा व टोरंटो कंपनी च्या वाढीव. बिलाच्या सवलतीत होणाऱ्या दिरंगाई व हेडसळ विरोधात भारतीय जनता पार्टी कळवा मंडळाच्यावतीने कळवा परिसरामध्ये निषेध मोर्चा वीज बिलाची होळी करण्यात आली त्याप्रसंगी ठाणे शहर सरचिटणीस मनोहर सुगदरे ठाणे शहर उपाध्यक्ष महिला दीपा गावंड कळवा मंडळ अध्यक्ष हिरोज कपोते निता. पाटील मनोहर मोती कर मनोज साळवे विजय वर्मा.ओम.जैस्वाल श्रीकांत ठोसर नरेश पवार प्रशांत पवार अरुण चौगुले अंकुश जाधव केशव शर्मा कन्हैयालाल विश्वकर्मा कळवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते व नागरिक वाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याप्रसंगी कळवा मंडळ अध्यक्ष हिरोज कपोते यांनी नागरिकांना आवाहन केले की आज महाराष्ट्रामध्ये भाजपकडून वाढिव. विज बिल संदर्भात आंदोलन करण्यात आलेले आहे आघाडी सरकारकडून जनतेची जी फसवणूक होत आहे सुरुवातीला वीज बिल माफ करणार म्हणून सरकारी घोषणा केलेली होती पण सरकार कडून तसं कोणतेही पाऊल उचलले न गेल्यामुळे आज नागरीकांमध्ये विज बिल वाढीव संदर्भात प्रचंड असंतोष पसरला आहे कळवा परिसरामध्ये टोंरटो पावर कंपनीची हुकूमशाही आम्ही सहन करुन घेणार नाही टोंरटो. ऑफिसमध्ये विज बिल संदर्भामध्ये चौकशी करण्यास गेले असता नागरिकांना तेथील स्टाफ समाधानकारक उत्तर सुद्धा देत नाही उलट वीज त्वरित भरावे अन्यथा तुमच्यावर केस टाकली जाईल असे धमकावले जाते त्यामुळे कळवा मंडळ वतीने इशारा देण्यात येत आहे की वाढीव वीज बद्दल संदर्भ योग्य तेव्हा लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
भाजपा कळवा मंडळाच्या वतीने विज बिल होळी आंदोलन
Reviewed by News1 Marathi
on
November 23, 2020
Rating:
Post a Comment