Header AD

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना महानगरपालिकेने केली आर्थिक मदत




भिवंडी , प्रतिनिधी  :  महानगरपालिका क्षेत्रातील पटेल कंपाऊंड येथील जीलानी बिल्डिंग दुर्घटना २१ सप्टेंबर रोजी घडली .या दुर्घटनेत ३८ जणांचा बळी गेला होता तर २१ जण जखमी झाले होते .या मृतांच्या वारसांना महाराष्ट्र शासन कडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली गेली परंतु ती आज रोजी पर्यंत मिळाली नसतानाच मागील महिन्यात झालेल्या ऑनलाईन महासभेत  महापौर प्रतिभा पाटील यांनी मृतांच्या वारसांना ५० हजार तर जखमींच्या वारसांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती .


आज महापौर दालनात महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या शुभहस्ते सदर रक्कमेच्या धनादेश वारसां कडे सुपूर्द केले.तर कोरोना काळात सेवा बजावताना कर्तव्यवरील महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांचा मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना १० लाख रुपये सहाय्य जाहीर केले होते .आज त्यापैकी दोन कामगारांच्या वारसांना दहा लाख रुपयांची निधी देण्यात आली .

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना महानगरपालिकेने केली आर्थिक मदत भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना महानगरपालिकेने केली आर्थिक मदत Reviewed by News1 Marathi on November 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads