Header AD

कल्याण डोंबिवलीत १७६ नवे रुग्ण तर ३ मृत्यू

 

५२,९७१ एकूण रुग्ण तर १०४७ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज...


 

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १७६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १७६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,९७१  झाली आहे. यामध्ये १३१३ रुग्ण उपचार घेत असून ५०,६११ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १७६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ३२कल्याण प – ५५डोंबिवली पूर्व – ५०डोंबिवली प – ३१मांडा टिटवाळा – तर मोहना येथील ३ रूग्णांचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ११ रुग्ण टाटा आमंत्रामधून१० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १७६ नवे रुग्ण तर ३ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १७६ नवे रुग्ण तर ३ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पार्टीला घवघवीत यश-१४३ ग्राम पंचातीमधुन १२३ सदस्यांची बहुमताने निवड

भिवंडी ,  प्रतिनिधी   :  संपुर्ण ठाणे जिल्ह्यात १५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या त्यापैकी १५ ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध ठरल...

Post AD

home ads