आमदार प्रताप सरनाईक यांची हेतुपुरस्सर इडी चौकशी ठाणे काँग्रेस प्रवक्ते सचिन शिंद
ठाणे , प्रतिनिधि : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात अंमलबजावणी संचालनालयाचं पथकाने टाकलेले छापे हेतुपुरस्सर टाकण्यात आले असल्याचा आरोप ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
शहर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन शिदे यांनी याबाबत बोलताना सांगितले की,अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण,अर्णब गोस्वामी आणि कंगन रनौत प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांचा विरोधात हा चौकशीचा फार्स सुरु आहे.
हेतुपुरस्सर हे राजकारण केले जात असून भाजपा सरकारच्या विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका यामूळेच भाजपाने राग काढून एक प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करित आहे.परंतु राज्यातील,ठाण्यातील काँग्रेस पक्ष हा आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी आहे व राहिल असेही सचिन शिंदे यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.

Post a Comment