Header AD

भिवंडीत ओबीसी समाजाचा तहसील दार कार्यालया बाहेर आक्रोश

 


भिवंडी  |  प्रतिनिधी   :  सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत असून,मराठा आरक्षणाच्या उद्भवलेल्या परिस्थितीत  ओबीसी सामाजावर अन्याय होण्याच्या भीतीने, आरक्षणास धक्का लावण्याच्या भीतीने संपूर्ण महाराष्ट्रातुन तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत .या प्रश्नांवर महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेढण्यासाठी  राज्यातील ३५८ तालुक्यात ओबीसी संघर्ष समिती च्या वतीने तहसीलदार कार्यालया बाहेर तीव्र निदर्शसने करण्यात आली .भिवंडी तहसीलदार कार्यालया बाहेर ओबीसी संघर्ष समिती चे प्रमुख पदाधिकारी प्रमोद जाधव ,अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या निदर्शनात देवा ग्रुप चे तानाजी मोरे ,आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे अँड भारद्वाज चौधरी ,ओबीसी संघाचे विनोद पाटील, भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष गुरुनाथ जाधव ,कुणबी सेना तालुकाध्यक्ष भगवान सांबरे ,काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष विजय पाटील ,शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य सचिव सुधीर घागस ,रामचंद्र दिसले ,अर्पिता पाटील यांसह असंख्य कार्यकर्ते सामील झाले होते .जात निहाय जनगणना होणार नसेल तर राज्य सरकारने महाराष्ट्रात जातनिहाय गणना करावी ,मराठा समाजाचे ओबीसी करण कटू नये ,महाज्योति संस्थेस भरीव आर्थिक सहाय्य मंजूर करावे अशा मागण्यांचे मुख्यमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे सुपूर्द केले . देशात ९०० वर्षात सर्वांचीच मोजणी होते ,या देशात गुराढोरांची,जनावरांची मोजणी होते परंतु विविध जातींमध्ये विखुरलेल्या ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत ओबिसी समाजाचे प्रश्न, समस्या कोणत्याही शासनाकडून सुटु शकत नाही.जनावरांची ,कुत्र्या मांजराची गणना होते मग आम्ही तर माणस आहोत आमची गणना व्हावी आमची जेवढी संख्या त्या प्रमाणात आम्हाला आरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे असे प्रतिपादन आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे संस्थापक अँड.भारद्वाज चौधरी यांनी केले आहे .

भिवंडीत ओबीसी समाजाचा तहसील दार कार्यालया बाहेर आक्रोश भिवंडीत ओबीसी समाजाचा तहसील दार कार्यालया बाहेर आक्रोश Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads