Header AD

भिवंडीत सार्वजनिक शौचालयाला भीषण आग आगीत संपूर्ण शौचालय जळून खाक

भिवंडी ,  प्रतिनिधी  :  भिवंडी शहरात एका सार्वजनिक  शौचालयाला भीषण आग लाग;लागल्याची घटना समोर आली आहे. हि घटना आज सकाळच्या सुमारास भिवंडी कल्याण रोड वरील वीजवितरणचे पॉवर हाऊसच्या भिंतीलगत असलेल्या  सार्वजनिक  शौचालयात घडली आहे.मात्र या भीषण आगीत संपूर्ण सार्वजनिक  शौचालय जळून खाक झाले आहे. तर या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांची  कुचंबणा झाली आहे.  या शौचालया लगत वीज वितरण कंपनीचे कंपाऊंड असून त्या ठिकाणी ५० केव्ही क्षमतेचे पॉवर हाऊस त्या ठिकाणाहून शहरातील बहुसंख्य भागात वीज पूरवठा केला जातो तर तेथेच अधिकारी कर्मचारी यांची निवासी इमारत आहे .


हा परिसर रहदारीचा व नागरी वस्तीचा असल्याने भिवंडी महापालिकेने २० ते २५ वर्षांपूर्वी पॉवर हाऊस समोरच्या फुटपाथवर नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालय लाखो रुपयाचा निधी खर्च करून उभारले होते. कालतंराने याठिकाणी फायबरचे शौचालय उभारण्यात आले. मात्र हेही  शौचालयाच दुरावस्थेत असूनही   महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. अशात ही परिसरातील नागरिक या शौचालयाचा वापर करीत होते. त्यातच आज सकाळच्या सुमाराला अचानक  शौचालयाला आग लागली. हे शौचालय फायबरचे असल्याने या आगीने काही वेळात भीषण रूप धारण केले.


दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अर्ध्यातासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तो पर्यत संपूर्ण  शौचालय जळून खाक झाले. सुदैवाने हि आग लगत असलेल्या पॉवर हाऊसला असलेल्या उंच भिंतीमुळे आत पसरू शकली नाही. जर आगीच्या कचाट्यात पॉवर हाऊस सापडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. विशेष म्हणजे आग लागली त्यावेळी  शौचालयात कोणीही नव्हते. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही.  तर आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
भिवंडीत सार्वजनिक शौचालयाला भीषण आग आगीत संपूर्ण शौचालय जळून खाक भिवंडीत सार्वजनिक शौचालयाला भीषण आग आगीत संपूर्ण शौचालय जळून खाक Reviewed by News1 Marathi on November 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads