Header AD

राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे सर्व धार्मिक संस्था, नागरिकांनी पालिका व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे,महापौर प्रतिभा विलास पाटील
भिवंडी , प्रतिनिधी : राज्य शासनाने दिनांक  14 नोव्हेंबर पासून राज्यातील सर्व  सर्व धर्मीयांची धार्मिक स्थळ उघडण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने भिवंडी शहरातील देखील सर्व धार्मिक स्थळ उघडण्यात येणार आहेत.या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सर्व धार्मिक संस्था बंद होत्या. सदर धार्मिक संस्था सुरू करणेकामी  राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे सर्व धार्मिक संस्थांचे पदाधिकारी,नागरिक यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी केले आहे.


धार्मिक संस्था सुरू करणे बाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. याबाबत महापौर प्रतिभा पाटील यांचे अध्क्षतेखाली महापौर दालनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भिवंडी पोलिस परिमंडळ 2 चे विभागाचे उपायुक्त योगेश चव्हाण, सभागृह नेते विलास पाटील,शिवसेना गटनेते संजय म्हात्रे,उपायुक्त डॉ.दीपक सावंत, पूर्व व पश्चिम विभागाचे सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पालिका सर्व प्रभाग अधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शासनाच्या धार्मिक मार्गदर्शक सूचना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 


शहरातील सर्व धार्मिक संस्था पदाधिकारी,नागरिक यांनी कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे, याबाबत पालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. मंदाटा राजा दयानिधी यांनी सर्व संबंधित यांना आदेश निर्गमित केले आहेत. सर्व नागरिक, धार्मिक संस्था यांनी याकामी पोलिस व पालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन संयुक्तपणे केले आहे.


राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे सर्व धार्मिक संस्था, नागरिकांनी पालिका व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे,महापौर प्रतिभा विलास पाटील राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे सर्व धार्मिक संस्था, नागरिकांनी पालिका व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे,महापौर प्रतिभा विलास पाटील Reviewed by News1 Marathi on November 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads