विषाणूच्या भीतीने येनला काही प्रमाणात नफा
◆लेखक: श्री. वकारजावेद खान, संशोधन विश्लेषक, एंजल ब्रोकिंग लिमिटेड.....
जागतिक आर्थिक सुधारणेबाबत अनिश्चितता असल्याने जोखिमीच्या संपत्तीचे मूल्य कमी होऊ लागले आहे. युरोपच्या काही प्रमुख भागात तसेच नव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्याने आणि अमेरिकेच्या वित्तीय प्रोत्साहन पॅकेजच्या घोषणेस उशीर झाल्यामुळे जोखमीच्या मालमत्तेचे मू्ल्य कमी होऊन येनसारख्या सुरक्षित मालमत्तेचे मूल्य वाढते. सप्टेंबर महिन्यातच्या सुरुवातीपासून जेपीवायआयएनआर (JPYINR) ची ३.५ टक्क्यांनी घटले तर युएसडीजेपीवाय (USDJPY)चे मूल्य १.३ टक्क्यांनी कमी झाले. इतर सुरक्षित मालमत्ता डॉलर निर्देशांकात त्याच कालावधीत १.६८ टक्क्यांनी वाढ झाली.
जपानच्या कोव्हिड-१९ रुग्णांच्या संख्या १०,००० पातळीपुढे: जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जपानमध्ये कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेस सुरुवात झाली. देशात ३ ऑगस्टपासूनच दुस-या लाटेचे दैनंदिन उच्चांक गाठलेले दिसून आले. दररोज ते १९८८ पर्यंत वाढत होते. तेव्हापासून रुग्णसंख्या कमी होत असून सध्या देशातील दैनंदिन रुग्णांचे प्रमाण ५०० एवढे आहे. तरीही जपानमधील सध्या एकूण रुग्णांची संख्या १००००० अंकांपुढे गेली आहे.
दरम्यान, जपान हा आर्थिक सुधारणेसाठी बहुतांश प्रमाणात निर्यातीवर अवलंबून आहे. सप्टेंबर महिन्यात जपानची निर्यात ४.९ टक्क्यांनी घसरली असून ऑगस्ट महिन्यातील १४.८ टक्क्यांवरून ती अशा प्रकारे घसरली. अडीच वर्षापेक्षा जास्त काळ चीनला झालेल्या निर्यातीत सर्वाधिक फायदा झाला. त्यामुळे सुधारीत आकडेवारीनंतर व्यापारातील नकारात्मक कालावधी निघून गेल्याचे दिसून येते. दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी कमी नोंदवली गेल्याने अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा करण्याचे आव्हान नवे पंतप्रधान योशीदे सुगा यांच्यासमोर आहे. जपानच्या अर्थव्यवस्थेत निर्यात हा मुख्य मुद्दा असल्याने पंतप्रधानांचे यशही यावरच अवलंबून आहे. तथापि, युरोप व अमेरिकेसारख्या प्रमुख व्यापारी भागीदारांमध्ये विषाणूचा प्रसार अधिक वाढल्याने जागतिक व्यापार बाजारावरील अर्थव्यवस्थेतील लवचिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे.
बीओजेने २०२१ मधील जपानची वृद्धी कमी दर्शवली: बीओजेने आर्थिक वृद्धीचा अंदाज कमी दर्शवला तसेच वित्त वर्षात महागाई अंदाज नोंदवला. मात्र शेवटच्या बैठकीत मोठ्या प्रोत्साहन पॅकेजचा निर्णय बदलला नाही. आवश्यकता भासल्यास नवीन प्रोत्साहनपर पॅकेज घोषित करण्यास सेंट्रल बँकेची तयारी आहे.
बीओजे २०२१ या वर्षात जपानची अर्थव्यवस्था ५.५ टक्क्यांनी आकुंचन पावेल, अशी अपेक्षा व्यक्त करते. जुलै महिन्यातील बैठकीत हा अंदात ४.७ टक्के एवढा होता. सेवांच्या मागणीत उशीर झाल्याने सुधारणेवर परिणाम झाला. यामुळे अर्थव्यवस्था संकुचित होऊ शकते. बीओजेने बँकांच्या डिपॉझिटवर ०.१ टक्के नकारात्मक व्याजदर ठेवला आणि १० वर्षांचे उत्पन्न शून्य टक्क्यांपर्यंत राहिल, याची सुनिश्चिती करण्याकरिता जपानी सरकारच्या बाँडची अमर्याद खरेदी कायम ठेवली.
आउटलुक: विषाणूवर लस निघाल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर व तसेच ती येण्याच्या तारखेमुळे जगभरातील भीती हळू हळू कमी होत आहे. अमरिकेतील निवडणुकीचे निकाल आणि अमेरिकन सरकारच्या दुसऱ्या प्रोत्साहन पॅकेजमध्ये होणारा विलंब यामुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरणदेखील आहे.
युरोपियन युनियनने नुकतीच कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे नोंदवले. यामुळे या भागातील अनेक देशांमध्ये अंशत: लॉकडाऊन आहे. जागतिक मागणीत सुधारणा अनिश्चित असल्याने अजून जोखीम कायम आहे. परिणामी सुरक्षित येनच्या मागणीवर लक्ष कायम असल्याचे दिसून येते.
दरम्यान, जपान सरकारने ऑक्टोबरमधील मासिक अहवालात इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रवासावरील उच्च खर्चाचे प्रमाण वाढलेले दर्शवले. कोरोनाच्या साथीमुळे अर्थव्यवस्थेवर व्यापक परिणाम होत असल्याने दबाव कायम आहे. जपान सरकारने यापूर्वीच २.२ ट्रिलियन डॉलर अमेरिकन डॉलर्सचे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र बाजाराला या पॅकेजमध्ये आणखी वाढीची अपेक्षा आहे.
लस विकसित होणे किंवा मोठ्या प्रमाणावर उत्पादनासंबंधी आणखी बातम्यांनी जपानी येनची मागणी कमी होऊ शकते. म्हणूनच, जेपीवायआयएनआर (सीएमपी: ७१) चे प्रमाण स्पेक्ट्रमच्या ७० या खालील टोकापासून नोव्हेंबर २०२० च्या अखेरीस ७२ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Post a Comment