Header AD

टीसीएलची २०२० मध्ये दमदार कामगिरी

 मुंबई, १८ नोव्हेंबर २०२० : टीसीएल या दुस-या क्रमांकावरील जागतिक टेलिव्हिजन ब्रँड आणि अग्रेसर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक कंपनीने २०२० मध्ये विविध नवीन उत्पादनांच्या लॉन्चसह दमदार कामगिरीची नोंद केली आहे. कंपनीने नव्या टीव्ही सीरिज लॉन्चसह अत्याधुनिक इन्व्हर्टर टेक्नोलॉजीने संचलित स्मार्ट एअर कंडिशनरदेखील सादर केले आहेत. यासह टीसीएलने इन हाऊस ऑनलाइन स्टोअरदेखील लाँच केले आहेत. उत्कृष्ट डील्ससोबत भरपूर उत्पादनेही यात सादर करण्यात आली आहेत. खरेदीचा अनुभव अधिक चांगला बनवण्यासाठी आता ब्रँडने बजाज फायनान्स कार्डवर सोप्या ईएमआयची सवलत दिली आहे. ती २१०० रुपये किंमतीपासून सुरू आहे. वेगवेगळ्या मूल्य श्रेणीसह सूचीबद्ध उत्पादनांवर ही सवलत असेल.


दुसरीकडे टीसीएलने एआय अल्ट्रा-इन्व्हर्टर एसी, टायटन गोल्ड इव्हॅपोरेटर आणि कंडेन्सरदेखील सादर केले आहेत. सिल्व्हर आयन फिल्टर बॅक्टेरिया संपवून खोलीत शुद्ध आणि ताजी हवा येण्यासाठीही मदत करते. तसेच आर ३२ इको फ्रेंडली रेफ्रिजरेंट, डिजिटल तापमान डिस्प्ले, १०० टक्के कॉपर ट्युबिंग आणि फोर-वे एअर फ्लो असून तो खोलीत एकसारखी कुलिंग प्रदान करतो. यासह टीसीएल टीव्हीमध्ये अग्रगण्य आधुनिक तंत्रज्ञान वापरले असून यात डॉल्बी एचडीआर व्हिजन, क्वांटम डॉट डिस्प्ले, फोरके यूएचडी, एचडीआर १०+, हँड्स फ्री व्हॉइस कंट्रोल, एआय एक्स आयओटी आणि इतर अनेक सुविधांचा समावेश आहे.


टीसीएल इंडियाचे महाव्यवस्थापक माइक चेन म्हणाले, ‘आम्ही आमच्या भारतीय ग्राहकांसाठी नवी उत्पादन शृंखला सुरू करून या सीझनमध्ये अनेक यशस्वी टप्पे पार केले आहेत. ग्राहकांसाठी बेस्ट-इन-क्लास उत्पादनांची निर्मिती आणि वितरणाकरिता आमची वचनबद्धता यातून अधोरेखित होते. टीसीएलमध्ये ग्राहकांचा अभ्यास करणे, त्यांच्या गरजा ओळखणे आणि नवीन तंत्रज्ञानासह त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणे, महागड्या किंमतींचे ओझे न देता ग्राहकांचे समाधान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.’

टीसीएलची २०२० मध्ये दमदार कामगिरी टीसीएलची २०२० मध्ये दमदार कामगिरी Reviewed by News1 Marathi on November 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads