Header AD

भिवंडीत जबरीने मोबाईल हिस्कावणाऱ्या त्रिकुटास गुन्हे शाखेने केले अटक,९ गुन्ह्याचा उलगडा
भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी शहर व ग्रामीण परिसरामध्ये वाहना वरून जाणाऱ्यांच्या खिशातील मोबाईल जबरीने हिसकावण्याच्या घटनांसह  वाहन चोरीच्या घटना मोठया प्रमाणात वाढल्या असताना भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना खबरी मार्फत  मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे कसून चौकशी केल्यावर त्यांच्या जवळून सात महागडे मोबाईल व तीन दुचाकी वाहन असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .


समद मोहम्मद अय्युब मोमीन ,साबीर रहमान अन्सारी असे मोबाईल स्नाचिंग करणाऱ्या आरोपींची नावे असून चोरीचे मोबाईल फोन व वाहन विक्रीसाठी मदत करणारा सहआरोपी शाहबाज अहमद अन्सारी अशा अटक केलेल्या तिघा आरोपींची नावे असून  भिवंडी पोलीस परिमंडळ हद्दीतील ४, तालुका व पडघा या ग्रामीण पोलीस ठाण्यातील २ अशा एकूण ९ गुन्ह्याचा उलगडा भिवंडी गुन्हे शाखेने केला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या नेतृत्वाखाली सपोनि महेंद्र जाधव,पो उप निरी संतोष चौधरी ,सहा पो उप निरी अब्दुल मंसुरी, पो हवा राजेंद्र चौधरी ,राजेंद्र अल्हाट, प्रवीण जाधव ,पो ना.प्रकाश पाटील,अनिल पाटील यांनी ही कामगिरी केली आहे .
भिवंडीत जबरीने मोबाईल हिस्कावणाऱ्या त्रिकुटास गुन्हे शाखेने केले अटक,९ गुन्ह्याचा उलगडा भिवंडीत जबरीने मोबाईल हिस्कावणाऱ्या त्रिकुटास गुन्हे शाखेने केले अटक,९ गुन्ह्याचा उलगडा Reviewed by News1 Marathi on November 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads