Header AD

ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम ते मुलुंड चेकनाका आणि माजिवडा नाका ते कल्याण नाका या मार्गावर बससेवा सुरु

 

■प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेण्याचे परिवहन सेवेचे आवाहन...


ठाणे, प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्यावतीने ठाणे रेल्वे स्थानक ते मुलुंड चेकनाका आणि माजिवडा नाका ( गोल्डन डाईज जंक्शन ) ते कल्याण नाका या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन समितीचे सभापती विलास विनायक जोशी यांच्या सूचनेनुसार बससेवा सुरु करण्यात आली असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे. 


ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे नवनिर्वाचित सभापती विलास विनायक जोशी यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी ठाणे शहरामध्ये विविध मार्गावर  फिरुन प्रवाशांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या सुचना विचारात घेतल्यानंतर तांतडीने ठाणे रेल्वे स्थानक ते मुलुंड चेकनाका आणि  माजिवडा नाका ( गोल्डन डाईज जंक्शन ) ते कल्याण नाका या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने परिवहन सेवेच्यावतीने ठाणे रेल्वे स्थानक ते मुलुंड चेकनाका आणि  माजिवडा नाका ( गोल्डन डाईज जंक्शन ) ते कल्याण नाका या मार्गावर २३ नोव्हेंबर २०२० पासून बससेवा सुरु करण्यात आली आहे. 


ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम ते मुलुंड चेकनाका, या मार्ग  क्र. 31 वर सकाळी 07.20, 08.00, 08.50, 09.45, 19.55, 20.45 व रात्री  21.30  या वेळेत एकूण 7 बस फे - या सुरु करण्यात आल्या आहेत.  मुलूंड चेक नाका ते ठाणे स्थानक पश्चिम ,या मार्ग क्र. 31 वर सकाळी  07.00,07.40,08.25.09.50 , 10.40,19.40,20.20.21.10. व  रात्री 21.50 या वेळेत एकूण ९ बस फे - या सुरु करण्यात आल्या आहेत.  


तर माजिवडा नाका ( गोल्डन डाईज जंक्शन ) ते कल्याण नाका , या मार्ग  क्र.  86 वर सकाळी 07.00 , 08.40 , 10.50 , 12.30 , 16.15 , 17.55 , 20.05, व रात्री 21.45 एकूण 8 बस फे - या सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच कल्याण नाका ते माजिवडा नाका ( गोल्डन डाईज जंक्शन ) या मार्ग क्र.86 वर सकाळी 06.20,07.50,09.30 , 11.40 , 15.30 , 17.05 , 18.45 व रात्री 20.55 या वेळेत एकूण 8 बस फे - या सुरु करण्यात आल्या आहेत.  तरी प्रवाशांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने  करण्यात आले आहे. 

ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम ते मुलुंड चेकनाका आणि माजिवडा नाका ते कल्याण नाका या मार्गावर बससेवा सुरु ठाणे रेल्वे स्थानक पश्चिम ते मुलुंड चेकनाका आणि माजिवडा नाका ते कल्याण नाका या मार्गावर बससेवा सुरु Reviewed by News1 Marathi on November 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads