Header AD

डुंगे गावातील विकास कामांचे खासदारांच्या हस्ते लोकार्पण

 भिवंडी , प्रतिनिधी  :  तालुक्यातील डुंगे ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले.यावेळी जिल्हा परिषदेच्या सभापती सपना राजेंद्र भोईर,पंचायत समितीचे प्रभारी सभापती जितेंद्र डाकी,भाजपचे तालुकाध्यक्ष पी के म्हात्रे,महादेव घाटाळ,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ.प्रदीप घोरपडे , डुंगे ग्राम पंचायतीच्या सरपंच भारती निलेश भगत वडघरच्या सरपंच जागृती सोनावणे, माजीसरपंच गणेश पाटील , भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामनाथ पाटील, उपसरपंच भावना तरे , सदस्या विजया सचिन भगत , हेमलता कैलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डुंगे ग्राम पंचायतीने राष्ट्रीय पेयजल निधीतून ७२ लाखांची नळ पाणी योजना गावासाठी राबविली असून तिचे उदघाटन तसेच डुंगे गाव स्वागत कमान ते लक्ष्मी नारायण मंदिर पर्यंतच्या आरसीसी रस्त्याचे लोकार्पणासह सुमारे इतर चौदा विविध कामांचे लोकार्पण यावेळी खासदार कपिल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलतांना गावात विकास कामे करतांना राजकारण करू नये असा सल्ला त्यांनी ग्रामस्थांना दिला असून विकास कामांसाठी केवळ दृष्टी असून चालत नाही तर त्यासाठी दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसांच्या काळात आपण २५० कोटींचा निधी भिवंडीच्या ग्रामीण भागासाठी आणला होता , महाविकास आघाडीने किमान ५०० कोटींचा निधी मंजूर करावा व ग्रामीण भिवंडीचा विकास करावा असे आवाहन देखील खासदार पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडीला याप्रसंगी। केले आहे. 

डुंगे गावातील विकास कामांचे खासदारांच्या हस्ते लोकार्पण डुंगे गावातील विकास कामांचे खासदारांच्या हस्ते लोकार्पण Reviewed by News1 Marathi on November 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads