Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ५३ हजारांचा टप्पा


■२०४ नवे रुग्ण तर  मृत्यू ५३,१७५ एकूण रुग्ण तर १०५० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ८६ रुग्णांना डिस्चार्ज...

 

कल्याण , कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ५३ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या २०४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या २०४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५३,१७५  झाली आहे. यामध्ये १४२८ रुग्ण उपचार घेत असून ५०,६९७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २०४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ३२कल्याण प – ६०डोंबिवली पूर्व – ६४डोंबिवली प – ३४मांडा टिटवाळा – मोहना – ७, तर पिसवली येथील १ रूग्णांचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ११ रुग्ण टाटा आमंत्रामधून४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, १ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, २ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ५३ हजारांचा टप्पा कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला ५३ हजारांचा टप्पा Reviewed by News1 Marathi on November 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads