Header AD

भिवंडी शहराच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या काटई ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना करावी लागते पाण्यासाठी वणवण
भिवंडी ,  प्रतिनिधी   :  भिवंडी शहराच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर असणाऱ्या काटई ग्रामपंचायत हद्दीत मागील कित्येक वर्षांपासून पाणी टंचाई ची समस्या उद्भवली असून, नागरिकांना गेल्या अनेक महिन्यापासून पाण्या साठी वणवण करावी लागत आहे.ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या जवळपास २० हजारच्या आसपास असलेल्या या गावात नळ आहेत पण नळाला पाणी नाही असे चित्र सर्वत्र दिसत आहे . गेल्या अनेक महिन्या पासून गावातील नळाला पाणी नाही त्यामुळे येथील कुटुंबियांना पिण्याचे पाणी फिल्टर प्लांट वाल्यां कडून विकत घ्यावे लागत आहे .तर घरातील सर्व कामे सोडुन महिला व पुरुषांना  पाण्यासाठी भटकत रहावे लागत आहे.


काटई ग्रामपंचायत हद्दीतील गृहिणींना सुद्धा आपल्या घरातील इतर कामे सोडून बोरवेल च्या पाण्यासाठी रांगेत उभे रहावे लागत आहे. तर अनेक जण पाण्याच्या छोट्या टँकर ने पाण्याची सोय करीत आहे.गावात बोरवेल पैकी काही बंद आहेत तर ज्या चालू आहेत त्यांना खारट पाणी येत असल्याने ते खारट पाणी रोजच्या इतर दैनंदिन कामा साठी वापरावे लागते.गावातील पुरुष मंडळी आपल्या दुचाकींचा उपयोग पाणी वाहतूक करण्यासाठी करीत आहेत. पाणी वितरण करणाऱ्या स्टेम वॉटर कंपनी कडून ग्रामीण भागातील काही ग्रामपंचायतींना सुद्धा पाणी पुरवठा केला जातो त्यानुसार या ग्रामपंचायतीस स्टेम कडून १ एमएलडी पाणी मंजूर असून ते भिवंडी शहरातील ज्या भागातून पाईप लाईनद्वारे वितरण केले जाते त्या भिवंडी शहरातील मिल्लत नगर , संगमपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळ जोडण्या केल्या गेल्याने हे १ एम एल डी पाणी गावातील टाकी पर्यंत पोहचत नसल्याने संपूर्ण गावाला पाण्यासाठी वणवण करून भटकावे लागत आहे.


या बाबत स्टेम प्रशासनासह भिवंडी महानगरपालिका प्रशासनास कारवाई करण्यासाठी अनेक विनंती पत्र देऊन ही कार्यवाही होत नसल्याने सरपंच मीना जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे.गावात पाणी येत नसल्याने येथे राहणाऱ्या कामगार वर्गाचेही मोठे हाल होत आहेत पिण्यासाठी पाणी विकत आणण्यासाठी पैसे खर्च करावे लागत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर ही पाणी टंचाई ने नागरिकांचे हाल सोसावे लागत आहेत.या परिस्थितीत येत्या आठ दिवसात सुधारणा न केल्यास या विरोधात सर्व ग्रामस्थ उग्र आंदोलन करून जाब विचारतील असा इशारा ग्राम पंचायत सदस्य गणेश  पाटील यांनी दिला आहे .
भिवंडी शहराच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या काटई ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना करावी लागते पाण्यासाठी वणवण भिवंडी शहराच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या काटई ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना करावी लागते पाण्यासाठी वणवण Reviewed by News1 Marathi on November 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads