Header AD

केमिकल कंपन्यातील अपघात रोखण्यासाठी डोंबिवलीत`रीअॅक्टर सेफ्टी`मार्गदर्शनपर शिबीर
डोंबिवली, शंकर जाधव : कारखान्यातील वाढत्या स्फोटच्या घटनेवर गांभीर्याने लक्ष देत कल्याण अंबरनाथ मन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि औद्योगिक आरोग्य सुरक्षा संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी डोंबिवली येथील कामा संघटनेच्या कार्यालयात`रीअॅक्टर सेफ्टी`विषयावर मार्गदर्शनपर शिबीर भरविण्यात आले होते. या शिबिरात अनेक केमिकल कंपनीतील सेफ्टी ऑफिसर यांनी  उपस्थिती दर्शविली होती.यावेळी रीअॅक्टर सेफ्टी तज्ञ डॉ. वाल्मिकी ढाकणे आणि कृष्णा यादव यांनी उपस्थित अभियंताना मार्गदर्शन दिले.यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, मार्ग कमिटीचे उद्य वालावलकर, निवृत्त सेफ्टी इन्चार्ज बापजी चौधरी,घरडा केमिकलचे विकास पाटील यादी मान्यवर उपस्थित होते.ठाणे जिल्ह्यात अश्या प्रकारचे शिबीर पहिल्यादा भरविण्यात आल्याचा दावा यावेळी बापजी चौधरी यांनी पत्र्कारांशी बोलताना केला.


`रीअॅक्टर सेफ्टी` हे केमिकल कारखान्यासाठी अतिमह्त्वाचा भाग बनला आहे.कारखान्यातील सेफ्टी ऑफिसर यांना यासंदर्भातील संपूर्ण माहिती मिळणे आवश्यक असल्याने यासाठी कामा संघटनेने पुढाकार घेत `रीअॅक्टर सेफ्टी`मार्गदर्शनपर शिबीर भरविले होते.यावेळी रीअॅक्टर सेफ्टी तज्ञ डॉ. वाल्मिकी ढाकणे आणि कृष्णा यादव यांनी मार्गदर्शन करताना छोटीसी चूक हे जीवघेणे होऊ शकते. यासाठी कोणती काळजी घ्यावी याची थोडक्यात माहिती दिली. तर देवेन सोनी यांनी यासंदर्भात माहिती देताना कामा संघटनेने पुढाकार घेऊन अश्या प्रकारच्या शिबिराचे आयोजन केले आहे. तसे अनेक राज्यातील अनेक शहरात भरविले गेल्यास भविष्यातील अपघात होणार नाहीत.


कामा संघटनेला यासाठी विविध शहरातील असोसिएशने संपर्क केल्यास त्यांना याबाबत तज्ञांच्या माध्यमातून माहिती दिली जाईल. तर निवृत्त सेफ्टी इन्चार्ज बापजी चौधरी यांनी केमिकल कंपनीत काम करताना`सेफ्टी`हा विषय खूप महत्वाचा असतो. यासाठी कोणती काळजी घ्यावी हे अश्या प्रकारच्या शिबिरातून मिळते. शिबिर संपल्यावर काही दिवसांनी काम संघटनेचे पदाधिकारी कंपन्याच्या रीअॅक्टर सेफ्टी बाबत सर्वे करतात.त्यामुळे प्रत्यक्षात याची किती अंमलबजावणी करण्यात आली आहे याकडेही कामा संघटनेचे लक्ष असते असे यावेळी अध्यक्ष देवेन सोनी यांनी आर्वजून सांगितले.

केमिकल कंपन्यातील अपघात रोखण्यासाठी डोंबिवलीत`रीअॅक्टर सेफ्टी`मार्गदर्शनपर शिबीर केमिकल कंपन्यातील अपघात रोखण्यासाठी डोंबिवलीत`रीअॅक्टर सेफ्टी`मार्गदर्शनपर शिबीर Reviewed by News1 Marathi on November 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads