Header AD

प्रत्येक गावात ओबीसी मोर्चाच्या शाखा उघडणार कपिल पाटील

  भिवंडी, प्रतिनिधी  :  भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात भाजपाच्या ओबीसी मोर्चाची शाखा उघडण्यात येईल, असा निर्धार खासदार कपिल पाटील यांनी बुधवारी येथे केला. १ बूथ १० ओबीसी कार्यक्रमानुसार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही कपिल पाटील यांनी केले.भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हा कार्यकारिणीचियी पदनियुक्ती कार्यक्रमात अध्यक्षपदावरून खासदार कपिल पाटील बोलत होते. या वेळी आमदार व जिल्हाध्यक्ष किसन कथोरे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, प्रदेश महिला मोर्चाच्या वनिता लोंढे, हरिश्चंद्र भोईर, अनिल पंडित, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदे यांची उपस्थिती होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्यामुळे भाजपा आज घराघरात पोहोचला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष व आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी आणखी जोमाने कार्य करावे, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात ओबीसी मोर्चाची शाखा स्थापन करण्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली.


आगामी काळात निवडणूका येणार असल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने कामाला लागण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्ष हा ओबीसींचा पक्ष आहे. ओबीसी मोर्चाची महाराष्ट्रात कार्यकारिणी जाहिर करण्यात येणार असून, १ बूथ १० ओबीसी हा कार्यक्रम समोर ठेवून ओबीसी मोर्चा कार्य करीत आहे, असे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी नमूद केले.ओबीसी हा समाजातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींची जनगणना झालीच पाहीजे. यापुढील काळात कोणत्याही समाजाला न दुखवता ओबीसी प्रश्न सोडवण्यास कटीबध्द राहू, अशी ग्वाही आमदार किसन कथोरे यांनी दिली. तर ठाणे ग्रामीण जिल्ह्यात ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून पक्ष मजबूत करणार असल्याचा निर्धार रवींद्र चंदे यांनी व्यक्त केला.
प्रत्येक गावात ओबीसी मोर्चाच्या शाखा उघडणार कपिल पाटील प्रत्येक गावात ओबीसी मोर्चाच्या शाखा उघडणार  कपिल पाटील Reviewed by News1 Marathi on November 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads