ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठान आयोजित ऑनलाइन दिपावली चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे | प्रतिनिधी : दिपावली निमित्त ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील इतिहास कालीन गडकिल्यांचा इतिहास सदैव्य जागृत राहण्याकरिता ऑनलाइन दिपावली गडकिल्ले चित्रकला स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी चित्रकला स्पर्धेमध्य गडकिल्ल्यांचा विषय असल्याने स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची आवड असलेल्यांकरिता ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन चित्रकला स्पर्धेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता स्पर्धकांना इतिहास कालीन गडकिल्यामधील मुरुड जंजिरा, शिवनेरी आणि रायगड किल्ला असे तीन विषय देण्यात आले होते. यापैकी एका किल्ल्याचे चित्र स्पर्धकांना काढण्याचे सांगण्यात आले होते. यामुळे स्पर्धकांनी चित्र काढून त्याला रंग देऊन ऑनलाईन लिंक वर संबीट केले.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लहान मुलापासून नागरिकानी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल दिनांक 8 नोव्हेंबर 2020 रोजी लागणार असून विजेत्या स्पर्धकाला प्रतिष्ठानच्या वतीने प्रमाणपत्र आणि पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानचे खजिनदार सूरज कदम, प्रज्ञा जाधव, नम्रता पाटील, आश्विनी कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment