Header AD

फुटपाथ अतिक्रमण करणाऱ्या दुकान दारांवर पालिकेची करडी नजर


■पूजा,मधुबन टाॅकीजच्या गल्लीतील अनधिकृत शेड आणि फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी...


डोबिवली | शंकर जाधव  :  केडीएमसी हद्दीतील `ना फेरीवाला झोन` मध्ये बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिका प्रशासनाची कारवाई सुरु आहे. मात्र फुटपाथ अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना प्रशासन अभय देत आहे का असा प्रश्न जनसामान्यांना पडला होता.आता पालिकेने अश्या दुकानदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. फुटपाथ अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर पालिकेची करडी नजर पडली आहे. अनधिकृत शेड, फुथपाथवर अनधिकृत ओटे तोडण्यात आले.डोंबिवलीतील `ह`,`ग`आणि `फ` प्रभाग क्षेत्र हद्दीत अश्या दुकानदारांवर कारवाई सुरु असल्याने आता नागरिकांसाठी फुटपाथ रिकामे होत आहेत.मात्र डोंबिवली पूर्वेकडील पूजा,मधुबन टाॅकीजच्या गल्लीतील दुकानदार आणि फेरीवाल्यांवर अद्याप कारवाई होत असताना दिसत नाही.


ह`प्रभाग क्षेत्र हद्दीत पथकप्रमुख विजय भोईर आणि कर्मचाऱ्यांनी फुथपाथवर अनधिकृत ४२ शेड, १८ ओटे, १८ हातगाड्यांवर कारवाई केली. तर सात वजनकाटे जप्त केले. अनेक वर्षांपासून ज्ञानेश्वर मंगल कार्यालयालगत फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे.त्यावरही पथकप्रमुख भोईर यांनी कारवाई केली.`ग`प्रभाग क्षेत्र हद्दीतील डी.एन.सी.रोड,प्रगती कॉलेजजवळ आणि नांदिवली रोड येथील पाच दुकानदारांवर,रामनगर येथील दोन,शिवमंदिर येथील दोन, आयरेगाव,राजाजी पथ आणि पाटकर रोडवरील चार तर टंडन रोडवरील वजनकाटा, मंडप तोडण्यात आले.`ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी स्नेह करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख रमाकांत जोशी, अधीक्षक दीपक शिंदे यांसह उपपथकप्रमुख गणेश गोल्हे,बाजीराव आहेर व इतर कर्मचारी वर्गानी कारवाई केली.


तर`फ`प्रभाग क्षेत्र ह्द्दीतहि समाधानकारक कारवाई सुरु आहे.दरम्यान फुटपाथ अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची गती वाढवली पाहिजे अशी मागणी होत आहे.दिवाळी सन जवळ आला असून डोंबिवली पूर्वेकडील पूजा,मधुबन टाॅकीजच्या गल्लीत फेरीवाल्यांच्या दोन गटात हाणामारी झाली होती.तर अनधिकृत शेडहि लावले होते. कोरोना संकटाच्या आधी पालिकेने सदर ठिकाणी कारवाई केली. मात्र आता पुन्हा पालिका प्रशासनाच्या समोर या ठिकाणी दुकानदारांनी अनधिकृत शेड, फेरीवाले यांनी जागा अतिक्रमण केल्या आहेत.त्यावर मात्र पालिका प्रशासन कानाडोळा तर  केला नाही अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे.पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या स्काॅयवॉक नागरिकांसाठी खुला झाला असला तरी स्काॅयवॉक फेरीवाल्यांनी पुन्हा बसल्यास सुरुवात केली आहे. परंतु स्काॅयवॉकवरील फेरीवाल्यांवर अद्याप कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे.


फुटपाथ अतिक्रमण करणाऱ्या दुकान दारांवर पालिकेची करडी नजर फुटपाथ अतिक्रमण करणाऱ्या दुकान दारांवर पालिकेची करडी नजर Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप'

मुंबई, ५ मार्च २०२१ :  सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WO...

Post AD

home ads