Header AD

पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे ९० टक्के काम पूर्ण उद्यान एक्स्प्रेसचा खोळंबा आणि गर्डर ७५ एमएम सरकल्याने काम अपूर्ण
कल्याण ,कुणाल  म्हात्रे   :  कल्याणच्या बहूचर्चित पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम रविवारी ९० टक्के पूर्ण झाले. रविवारी सकाळी दादर स्टेशनवर उद्यान एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्याने पत्रीपुलाच्या मेगाब्लॉकला अर्धा तास उशिराने सुरुवात झाली. त्यातच शेवटच्या तासात गर्डर अपेक्षित स्थानापासून ७५ एमएम बाजुला सरकल्याने मुळ दिशा व जागेवर आणण्यात वेळ गेल्याने गर्डर लँचिग कामाच्या टारगेटला ग्रहण लागले. अन्यथा गर्डर लाँचिंगचे १०० टक्के काम रविवारी पूर्ण झाले असते.


७६ मीटर लांब, ११ मीटर उंच आणि ७०० टन वजनाच्या पत्रीपुल गर्डर लाँचिंगसाठी काल पासून काम सुरु आहे. याच कामासाठी मध्य रेल्वेवर आज दुसऱ्या टप्प्यातील ४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ज्यामध्ये उर्वरित ३६ मीटर अंतरावर अंतरावर गर्डर ढकलून ठेवणे अपेक्षित होते. त्यासाठी सकाळी पावणे दहा ते दुपारी पावणे दोन या वेळेमध्ये हा मेगाब्लॉक होणार होता. परंतू साधारणपणे सकाळी ९ ते ९.१५ च्या दरम्यान दादर रेल्वे स्थानकात उद्यान एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाला. जो दुरुस्त होईपर्यंत पत्रीपुलाच्या मेगाब्लॉकची वेळ उलटून गेली होती. परिणामी गर्डर लाँचिंगसाठी आवश्यक असणारा नियोजित वेळ  कमी झाला.


त्यातच प्रत्येक ६ मीटर अंतरावर गर्डर योग्य दिशेने योग्य जागेवर जात असल्याचे काटेकोर पणे पाहिले जाते. मेगाब्लॉक शेवटच्या तासात गर्डर अपेक्षित स्थानापासून ७५ एमएम बाजूला सरकल्याने मुळ दिशा, मुळ जागेकडे आण्यात वेळ गेल्याने फक्त अठरा मीटर इतके अंतर गर्डरच्या अपेक्षित अंतरापासुन बाकी राहिल्याची माहिती एमएसआरडीसी अधिकाऱ्यांनी दिली.


            उद्या रात्रीही मेगाब्लॉक मिळणे अपेक्षित-शिल्लक असलेल्या अंतरावर गर्डर नेण्यासाठी आणखी एका मेगाब्लॉकची आवश्यकता असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्यरेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांच्याशी त्याबाबत तातडीने चर्चाही केली. सध्याच्या उर्वरित कामासाठी एक तास पुरेसा असून पुढील शनिवारी आणि रविवारच्या नियोजित मेगाब्लॉकपूर्वी हे काम निश्चितच पूर्ण होईलअसा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच रेल्वेकडून आज किंवा सोमवारी रात्री हा मेगाब्लॉक मिळणे अपेक्षित असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.

पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे ९० टक्के काम पूर्ण उद्यान एक्स्प्रेसचा खोळंबा आणि गर्डर ७५ एमएम सरकल्याने काम अपूर्ण पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे ९० टक्के काम पूर्ण उद्यान एक्स्प्रेसचा खोळंबा आणि गर्डर ७५ एमएम सरकल्याने काम अपूर्ण Reviewed by News1 Marathi on November 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

दृष्टीहीनांना चेहरा दाखविणारी दिव्यदृष्टी

  ■यतः सत्यं यतो धर्मो यतो ह्रीरार्जवं यतः।  ततोभवति गोविन्दो यतः कृष्ण्स्ततो जयः अर्थात, जिथे सत्य, धार्मिकता, ईश्वरविरोधी कार्यात अंतःकरणा...

Post AD

home ads