Header AD

वाढीव वीज बिलांमुळे भिवंडीतील व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याची भीती भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल होळी आंदोलन

भिवंडी , प्रतिनिधी  :  कोरोना आपत्तीशी लढा सुरू असतानाच आकारण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे भिवंडीतील व्यावसायिक उद्ध्वस्त होतील अशी भीती व्यक्त करतानाच खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीत वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांबरोबरच भिवंडीवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ऐन लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनतेचे उत्पन्न घटलेले असताना महाविकास आघाडी सरकारने अन्यायकारक वीज दरवाढ लादल्यानंतर आता सवलत देण्यास नकार दिल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप आहे.


या पार्श्वभूमीवर भिवंडी शहर भाजपाच्यावतीने भाजप  शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्व.आनंद दिघे चौकात तर भाजप भिवंडी तालुका ग्रामीणचे अध्यक्ष पी.के.म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली  तहसिलदार कार्यालयासमोर सोमवारी वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले.खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष संतोष शेट्टी, ज्येष्ठ नेते शांताराम भोईर, जि.प.सदस्य तथा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, नगरसेवक सुमित पाटील,श्याम आग्रवाल,रवी सावंत, पंचायत समितीच्या सभापती संध्या नाईक, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर,सचिव प्रेमनारायण राय,राजू गांजेगी, प्रदेश कार्यकारीणी सदस्या सौ. कल्पना शर्मा, प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ.रेखा पाटील,प्रदेश दक्षिण भारतीय महासचिव कोका मल्लेशम,नगरसेवक निलेश चौधरी, दिलीप कोठारी, उपाध्यक्ष निष्काम भैरी, जियालाल गुप्ता, अनुसूचित जाती अध्यक्ष मधुकर जगताप, ओबीसी मोर्चा अध्यक्ष महेंद्र जाधव, दक्षिण भारतीय अध्यक्ष मोहन कोंडा, उत्तर भारतीय अध्यक्ष प्रवीण मिश्रा ,विधी सेल अध्यक्ष ऍड गणेश तिप्पनवार , मंडळ अध्यक्ष भरत भाटी, राजेंद्र वासम , विकास जैन, मारुती देशमुख, प्रेषित जयवंत उपसभापती जितेंद्र डाकी, तालुकाध्यक्ष पी.के. म्हात्रे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील, महिला आघाडीच्या ममता परमाणी, भाजयुमो तालुकाध्यक्ष निलेश गुरव, ज्येष्ठ भाजप नेते रामनाथ पाटील, सुधाकर म्हात्रे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यंत्रमागनगरी असलेल्या भिवंडी शहर व तालुक्याची अर्थव्यवस्था वीजेवर अवलंबून आहे.अशा परिस्थितीत लॉकडाऊनमध्ये अडचणीत आलेल्या शहरातील छोटे-मोठे व्यावसायिकांना लाखो रुपयांची वीजबिले धाडण्यात आली आहेत.या बिलांमुळे सामान्य नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांचे अर्थचक्र धोक्यात आले आहे.भिवंडी ग्रामीणमधील लॉजिस्टिक व्यवसायावर पाच लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह आहे. लॉकडाऊनमध्ये गोदामे बंद असताना कामगारांना रोजगार मिळाला नाही.अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी हजारो रुपयांची बिले कोठून भरायची ?  त्यातच आता वीज बिलांची सक्तीने वसुली केली जाणार असल्यामुळे भिवंडीतील नागरिक व व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे याकडे खासदार कपिल पाटील यांनी लक्ष वेधले.तर शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकार हे पुर्णतः फसवे सरकार आहे.सवंग लोकप्रियतेसाठी फक्त फसव्या योजनांची घोषणा करून जनतेची फसवणूक करीत आहे.
वाढीव वीज बिलांमुळे भिवंडीतील व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याची भीती भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल होळी आंदोलन वाढीव वीज बिलांमुळे भिवंडीतील व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याची भीती भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल होळी आंदोलन Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads