Header AD

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली व.पो.नि शत्रुघ्न माळी यांची सदिच्छा भेटकल्याण , कुणाल  म्हात्रे  :  सायबर सिटी खारघर शहर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी शत्रुघ्न माळी यांची नियुक्ती झाली आहे. पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खारघर शहराच्या वतीने जिल्हा अध्यक्ष आणि नगरसेवक सतीश पाटिल यांचा अध्यक्षतेखाली प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी माळी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत खारघर शहरात कायदा, सुव्यवस्था सामाजिक एकता राखण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना शुभेच्छा दिल्या. 
तर माळी यांनी देखील नागरिकांच्या सहकार्याने खारघर शहरात शांतता टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्वासन यावेळी दिले.यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ पदाधिकारी भाऊसाहेब लंबडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा उपाध्यक्ष आर. एन. यादव,  खारघर शहर प्रभारी कृष्णा मर्ढेकर, खारघर शहर विभागीय अध्यक्ष सुरेश रांजवण, प्रदिप पाटिल,  गणेश पाटिल, सामाजिक न्याय विभाग कार्यकते सुरेश यादव,  भिकाजी लोढे, खारघर शहर प्रभाग अध्यक्ष   महेशकुमार राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली व.पो.नि शत्रुघ्न माळी यांची सदिच्छा भेट राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली व.पो.नि शत्रुघ्न माळी यांची सदिच्छा भेट Reviewed by News1 Marathi on November 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads