Header AD

स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला आढावा


■स्वच्छतेची सर्व कामे तात्काळ पुर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना...


ठाणे ,प्रतिनिधी : ठाणे शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज आढावा घेवून मोहिमेंतर्गत स्वच्छतेची सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.


स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरू असून आज महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेवून केंद्र शासनाच्यावतीने सन 2021 साली होणा-या स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमातंर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामाचा आढावा घेतला.


शहरातील सार्वजनिक शौचालयातील नळ व्यवस्था,पाणी पुरवठा,तलाव साफसफाई, सार्वजनिक शौचालयांना नळ संयोजने, विद्युत व्यवस्था, तसेच परिसर स्वच्छता आदी गोष्टी अद्ययावत ठेवण्याचे काम सुरू असून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 


केंद्र शासनाने नवीन स्वच्छ सर्वेक्षण प्रणालीनुसार कार्यक्रमाचे नियोजन करावे तसेच स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेची नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होण्याकरीता विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.




स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला आढावा स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंतर्गत विविध कामांचा महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी घेतला आढावा Reviewed by News1 Marathi on November 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads