Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५४ हजार पार ८३ नवे रुग्ण तर १ मृत्यू


■५४,०४० एकूण रुग्ण तर १०६० जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज...


 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येने ५४ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ८३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या ८३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५४,०४० झाली आहे. यामध्ये १७०४ रुग्ण उपचार घेत असून ५१,२७६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८३  रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- कल्याण प – १८डोंबिवली पूर्व – ३१डोंबिवली प – २४मांडा टिटवाळा – , तर मोहना येथील एका रूग्णाचा समावेश आहे. 

 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल येथून तसेच ३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५४ हजार पार ८३ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ५४ हजार पार ८३ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads