Header AD

संत निरंकारी मिशनचे रक्तदान अभियान जारी भांडूप मध्ये ८७ निरंकारी भक्तांचे उत्साह पूर्ण रक्तदान
कल्याण , कुणाल म्हात्रे  :  संत निरंकारी मिशन द्वारे कोविड-१९ च्या अनलॉक फेज़मध्ये सुरु करण्यात आलेले रक्तदान अभियान जारी असून त्या अंतर्गत रविवारी  संत निरंकारी सत्संग भवन, खिंडीपाडाभांडूप येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ८७ निरंकारी भक्तांनी रक्तदान केले.


      वर्तमान महामारीच्या परिस्थितीतदेखिल निरंकारी भक्त आपल्या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवसेवेच्या शिकवणूकीला अनुसरुन मोठ्या उत्साहाने रक्तदानासाठी पुढे येत आहेत. संत निरंकारी रक्तपेढी द्वारे या रक्तदान शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यात आले. शिबिरामध्ये रक्तदाते आणि रक्तपेढीचे डॉक्टर्स तथा मेडिकल टेक्निशीयन्स टीमकडून कोविड-१९ च्या संदर्भात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करण्यात आले.
      या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक श्रीधर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. मंडळाच्या स्थानिक मुखींनी संत निरंकारी सेवादल तसेच संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराची सुंदर प्रकारे व्यवस्था करण्यात आली. 

संत निरंकारी मिशनचे रक्तदान अभियान जारी भांडूप मध्ये ८७ निरंकारी भक्तांचे उत्साह पूर्ण रक्तदान संत निरंकारी मिशनचे रक्तदान अभियान जारी भांडूप मध्ये ८७ निरंकारी भक्तांचे उत्साह पूर्ण रक्तदान Reviewed by News1 Marathi on November 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भोपरगाव मधील पाणी प्रश्न सुटणार ? अमृत योजनेची सुरवात भोपर गावातून मनसे आमदार राजू पाटील !

डोंबिवली, शंकर जाधव  :  भोपरगाव मधील पाणी प्रश्न हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे.आमदार राजू पाटील व नगरसेविका रविना माळी यांच्या प्रयत्नाने भ...

Post AD

home ads