पडघा जिल्हा परिषद गटाच्या महिला सदस्याचा उपोषणाचा इशारा
भिवंडी , प्रतिनिधी : ग्राम पंचयातीस कर्ज देण्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात सोमवारी उपोषण करत असल्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रेया श्रीकांत गायकर यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
श्रेया गायकर या भिवंडीतील पडघा जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या असून त्यांच्या मतदार संघात असलेल्या कुरुंद ग्रामपंचायतीत विकास कामांसाठी ग्राम पंचायतीने भिवंडी पंचायत समितीकडे एक कोटी रुपये कर्जाची मागणी केली आहे.पंचायत समितीमार्फत सदरचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी ठाणे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे.या कर्जा संदर्भात ६ जुलै २०२० रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देखील मिळाली आहे.
मात्र तरी देखील जिल्हा परिषद प्रशासन कुरुंद ग्रामपंचयातीस कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ करत असून केवळ राजकीय दबावापोटी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व अधिकाऱ्यांकडून ग्राम पंचयातीस कर्ज मिळण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.असा आरोप गायकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केला असून ग्रामपंचायतीस कर्ज उपलब्ध न केल्याने ग्राम पंचायतीच्या विकास कामांना खीळ बसली आहे.जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षित कारभाराविरोधात सोमवारी ठाणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा जि.प. सदस्या श्रेया गायकर यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
पडघा जिल्हा परिषद गटाच्या महिला सदस्याचा उपोषणाचा इशारा
Reviewed by News1 Marathi
on
November 06, 2020
Rating:

Post a Comment