Header AD

जनहितार्थ साठी कुशल नेतृत्व आणि आक्रमक आंदोलने हेच राष्ट्रवादीतील प्रविण पाटील यांच्यात कौशल्य

भिवंडी,  प्रतिनिधी  :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले कार्यध्यक्ष प्रविण पाटील यांच्यात असलेले कुशल नेतृत्व आणि आक्रमक आंदोलनाची धमक यामुळेच भिवंडी शहरातील नागरिकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यात यश आले असून न्याय मिळाला आहे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता फक्त 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही भूमिका प्रविण पाटील बजावत आहे त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं बळ मिळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. 


प्रविण पाटील यांचे वडील पोलीस खात्यात असल्यामुळे कायद्याची माहिती आणि पोलिसांशी असलेले घनिष्ट संबंध त्यामुळे  कोणत्याही गरीब, पीडित  नागरिकांसाठी पुढाकार घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र धावपळ करून न्याय मिळवून देणे त्याच प्रमाणे यंत्रमाग शहरात असलेल्या लाखो यंत्रमाग कामगारांच्या समस्या साठी धाव घेऊन त्यांना सहकार्य करणे त्यामुळे मोठा कामगारवर्ग त्यांच्या पाठीशी आजही उभा आहे,  भिवंडी शहरात कचऱ्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असताना 15 दिवस कचऱ्याचे ढिग शहरात साचले होते त्यावेळी एकही राजकीय नेता, लोकप्रतिनिधी पुढे आला नाही त्यावेळी फक्त   प्रविण पाटील यांनी आक्रमक आंदोलन करून कचऱ्याने भरलेला डम्पर थेट महापालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या आवरात  नेवून कचरा टाकला त्यामुळे एकच प्रशासनाची धावपळ झाली होती आणि या आंदोलनाची दखल घेऊन दुसऱ्या दिवसापासून शहरात स्वछता राबवण्यात आली होती तसेच चित्र आजही पाहवयास मिळत आहे.


महत्वाची बाब म्हणजे टोरंट पावर या वीज कंपनीने वीजबिल वसुली आणि वीज वितरणाचे काम हाती घेतले असताना सर्वात प्रथम आंदोलन करून तब्बल तीन दिवस काम बंद पाडण्यात यश मिळवले होते त्यानंतर कंपनीलाही  दखल घ्यावी लागली होती. महत्वाची बाब म्हणजे भिवंडी महापालिकेला  टोरंट पावर वीज कंपनीकडून 285 करोड घेणे असताना बॅनर बाजी आंदोलन करून सरकारला याची दखल घेऊन सर्व पैसे कंपनीला सरकारने माफ केले आहे, त्याच प्रमाणे  ड्रेनेज लाईनचे निकृष्ट दर्जाचे काम, रोड खोदून ठेवल्याने नागरिकांची होणारी परवड पाहून मोठं आंदोलन केल्याने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दखल घेऊन त्या ठेकेदाराचा ठेकाच रद्द करण्यात आला होता. रोडवरील खड्ड्यामुळे अपघाताच्या घटनात वाढ होत असल्याने चक्क खड्ड्यात बसून आंदोलन केले होते त्यामुळे महापालिकेने खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा मिळाला होता.


भिवंडी शहरात असलेल्या डाईंग, सायजिंग कंपन्यात चिंध्या आणि लाकूड जाळून प्रदुषणात वाढ होत असल्याने थेट  कंपन्यात  जाऊन आंदोलन करून कंपन्या बंद पडल्याने   प्रदुषण विभागाला जाग करीत कारवाया करायला लावल्या आहे. त्यामुळे चिंध्या जाळणे बंद करण्यात आले आहे. अशा प्रकारे जनहितार्थ आंदोलने करून नागरिकांना  न्याय देण्याचे काम प्रविण पाटील करताना पाहवयास मिळत आहे. त्यांच्याकडे कुशल नेतृत्व आणि आक्रमक आंदोलने हिच त्यांची खासियत असून ते कोणत्याच पदाची अपेक्षा करीत नसल्याने त्यांचा वेगळेपणा राष्ट्रवादीत पाहावयास मिळत आहे.  
जनहितार्थ साठी कुशल नेतृत्व आणि आक्रमक आंदोलने हेच राष्ट्रवादीतील प्रविण पाटील यांच्यात कौशल्य जनहितार्थ साठी कुशल नेतृत्व आणि आक्रमक आंदोलने हेच राष्ट्रवादीतील प्रविण पाटील यांच्यात कौशल्य Reviewed by News1 Marathi on November 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads