Header AD

ब्रह्मांड कट्टयाचे "एक नविन पाऊल निरोगी आरोग्यासाठी बी. एम. सी. ची स्थापना
ठाणे ,  प्रतिनिधी  :  ब्रह्मांड कट्टा गेली बारा वर्षे सातत्याने समाजासाठी परिसराचे व  आपल्या लोकाचे जीवन सुखी व संपन्न होण्यासाठी आवश्यक असण्या-या नवरसाचे प्रबोधन,संगीत ,कला,अभिनय, माध्यमातून  काम करीत आहे.   सध्याच्या कोविड काळातील लोकांची मानसिकता ,आज एकमेकांना खरच सर्व प्रकारची मदतीची  आधाराची भावनिक,तसेच आरोग्याची गरज लक्षात घेवून ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक  राजेश जाधव यांचे संकल्पनेतून  ब्रह्मांड मार्निग- इव्हनिग वाॅर्कस क्लब ची स्थापना करणेत आली.
 

या क्लबचे उदघाटन दिनांक ७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ७ वाजता आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे  व अर्चना  मणेरा उपस्थित होते. या क्लबसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचे अध्यक्षा यशश्री आपटे व सचिव एरिक बाॅतेलो यांची निवड करण्यात आली आहे. रवि सिंह , बाळकृष्ण कदम,प्रियांका निकम,अपर्णा  वखरे खर्डेनविस,. राममोहन पांडे,कु.यश निकम, रेणुका ठाकुर, मधुरl वैशंपायन हे कमिटीचे सदस्य आहेत. आरोग्याचे प्रश्न व त्यावरील उपाय या साठी तज्ञ डाॅक्टरांची सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे .

त्यात डाॅ. कोलते,डॉ.पालीवाल,डॉ.शिंदे, डॉ.वानखेडे, डॉ.अनिता शिंदे, डॉ.निलिमा दिशेचा,डॉ.चौहान याचा समावेश आहे. तसेच योग शिक्षक बापू भोगटे,श्री राम किशोर शर्मा, सौ. श्रध्दा देव,सौ वसुंधरा निकम हे योगाचे माहिती देतील. फिजीओथेरपिस्ट डॉ.अतुल पांडे,डॉ.निकीता सिंग, आयुर्वेद वैद्य श्वेता शेलार,आहारतज्ञ डॉ. केतकी  चव्हाण यांचे  मार्गदर्शन व सहकार्य लाभणार आहे .सायकलिंग व वॉकिंग तज्ञ श्री. राजेश बोंडे,तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी   विपशना मार्गदर्शक श्री. चंद्रकांत माने हे मार्गदर्शन करणार आहेत. 


ब्रह्मांड मॉर्निंग इव्हनिग वॉकर्स क्लब मार्फत डॉक्टर, आहारतज्ञ,योग गुरुजी याचे मार्गदर्शन खाली विविध कार्यक्रम व उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहिती सर्वांना लघुसंदेश द्वारे देण्यात येईल असे सांगण्यात आले. या तज्ञांच्या सल्ल्याचा व मार्गदर्शनाचा फायदा आपल्या आरोग्यासाठी होणार आहे तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी केले. 
ब्रह्मांड कट्ट्याने आरोग्यासाठी उचललेले  हे सामाजिक पाउल आहे या साठी माझ्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत असे मा.आमदार श्री संजय जी केळकर आपल्या उदघाटन भाषणात म्हणाले. त्यांचे स्वागत ब्रह्मांड कट्ट्याचे अध्यक्ष श्री. महेश जोशी, कलासंस्कार अध्यक्षा वर्षा गंद्रे,  वाचक कट्टयाचे विजयराज बोधनकर, संगीत कट्टयाचे आनंद खर्डीकर,  यांनी केले. 
यावेळी स्थानिक रहिवाशांनी एक निवेदन सादर केले. या साठी आवश्यक असलेले सहकार्य मिळेल असे आश्वासन मा.नगरसेवक मनोहर डुंबरे साहेब यांनी दिले.सचिव एरिक बॉतेलो यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
ब्रह्मांड कट्टयाचे "एक नविन पाऊल निरोगी आरोग्यासाठी बी. एम. सी. ची स्थापना ब्रह्मांड कट्टयाचे "एक नविन पाऊल निरोगी आरोग्यासाठी बी. एम. सी. ची स्थापना Reviewed by News1 Marathi on November 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )   राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अन...

Post AD

home ads