Header AD

ठाण्यात संयुक्त सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहिम अभियानाचे आयोजन


■''संयुक्त सक्रिय क्षय व कुष्ठरुग्ण शोध मोहिम 2020'' अभियानाबाबत आढावा बैठकीत बोलताना अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख सोबत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर.के. मुरुडकर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आदी...


ठाणे , प्रतिनिधी  :  क्षयरोग व कुष्ठरोग या गंभीर सामाजिक आरोग्य समस्येचे समूळ उच्चाटन करणेसाठी ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने ''संयुक्त सक्रिय क्षय व कुष्ठरुग्ण शोध मोहिम 2020'' अभियानाचे आयोजन दिनांक 1 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत करण्यात आले असून या मोहिमेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेवून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख यांनी केले आहे.


आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. क्षयरोग व कुष्ठरोग या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ठाणे शहरात अतिजोखमीच्या ठिकाणी एकूण 420 टीम शहरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याची क्षयरोग व कुष्ठरोग या आजाराची तपासणी करणार आहेत. 


तसेच या रोगाबाबतच्या लक्षणांची माहिती देखील टीममार्फत देण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील 6 लक्ष इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार असून आजारांचे लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांची मोफत एक्सरे, थुंकी तपासणी, सीबीनेट तपासणी जवळच्या सरकारी दवाखन्यात करुन रोगाचे निदान झाल्यास त्यांना त्वरीत मोफत औषधोपचार चालू करण्यात येणार आहेत.


या शोध मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा सेविका व स्वयंसेविका संस्थांचे स्वयंसेवक यांचे गट तयार करण्यात आले आहेत. त्या गटामार्फत घरोघरी भेट देवून क्षयरोग व कुष्ठरोग संबंधी पूर्ण माहिती व योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


ठाण्यात संयुक्त सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहिम अभियानाचे आयोजन ठाण्यात संयुक्त सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग रुग्ण शोध मोहिम अभियानाचे आयोजन Reviewed by News1 Marathi on November 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ट्रेलने सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला

◆ लाखो लोकांना लघु उद्योजक बनण्यासाठी सक्षम करण्याचा उद्देश.. मुंबई, २२ जानेवारी २०२१ :  भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेल...

Post AD

home ads