Header AD

शिवसेनेने विश्वास टाकल्याने जनतेची सेवा करण्याची संधी मिळते माजी नगसेवक वसंत भगत
डोंबिवली , शंकर जाधव  : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तत्कालीन नगरसेवक वसंत भगत यांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत विविध पायाभूत सुविधा प्रभागात केल्याची पावती खुद्ध प्रभागातील नागरिक देत आहेत. नागरिकांच्या अशा प्रेमापोटी केलेल्या कार्याचे पूर्ण समाधान वाटते. शिवसेनेच्या माझ्यावर विश्वास टाकल्याने  जनतेची सेवा करण्याची संधी मिळते असे वसंत भगत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.डोंबिवली पत्रकार संघ आणि पत्रकार मित्र यांच्याची सध्याची कोरोना महामारी आणि त्यामुळे प्रभागात उद्भवलेली परिस्थिती याविषयी त्यांनी संवाद साधला.डोंबिवली प्रत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव यांनी वसंत भगत यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल विशेष अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छ्या दिल्या. तर सदस्या राजलक्ष्मी पूजारे-जोशी यांनी प्रस्तावना केली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष सुरेश गायकवाडसचिव नरेंद्र थोरावडे, प्रवीण गोरेप्रशांत जोशी,जान्हवी मौर्य,पी.वासुदेवनमहावीर बडाला,ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांसह सदस्य तसेच भाग्यश्री प्रधान –आचार्य, सारिका शिंदे, शरद शहाणे,अवधूत सावंत आदी पत्रकार मित्र उपस्थित होते.मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्व प्रथम आमच्या म्हात्रेनगर प्रभागात झाला आणि एकूणच येथील सर्वांनाच संकटाचा सामना करावा लागला. त्या आठवणी आजही अंगावर शहारे आणतात. प्रभागातील बाधित कोरोनाग्रस्त नागरिकांना ताबडतोब औषधोपचार मिळावे यासाठी आमच्या प्रभागातील सर्वानीच केलेल्या एकत्रित कामामुळे म्हात्रेनगर मध्ये काही प्रमाणात घबराट कमी होण्यास मदत झाली. प्रभागाचे वैशिष्टय म्हणजे येथे पक्षीय राजकारण होत नाही.या प्रभागात नगरसेवक म्हणून केलेल्या विकास कामांची यादी मोठी आहे. पूर्वी येथे पाण्याचा प्रश्न होतो तो समपंप योजनेच्या माध्यमातून निकाली काढाल. संसर्गजन्य रोगांचा फैलाव होवू नये म्हणून रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधून सांडपाणी मार्गी लावता आले.घंटागाडी नियमितपणे प्रभागात फिरू लागल्याने त्याकाळी कचऱ्याचा आणि कचराकुंडीच्या दुर्गंधीतून प्रभागातील नागरिकांना मुक्तता मिळाली. विशेष म्हणजे प्रभागातील जेष्ठ नागरीकांना हक्काचा फिरण्याचं ठिकाण म्हणून जेष्ठ नागरिक कट्टागार्डन आदी व्यवस्था त्याकाळी निर्माण केल्या. आज त्या सर्वांना कदाचित भव्यता आणता आली पण त्याकाळी त्या निर्माण  करण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागले पण त्या कार्याबद्दल आजही नागरिक समाधानी आहेत याचा आनंद फार वेगळा असतो.माजी नगरसेवक वसंत भगत शिवसेना डोंबिवली उपशहर संघटक म्हणून क्रियाशील असून त्यांचे शिवसेना पक्षवाढीसाठी मोठे योगदान असल्याची चर्चा शहरात ऐकिवात आहे. प्रभागातील नागरिकांमध्ये कोरोनाबाबत नेहमी भगत जनजागृती करीत असून सर्वांनी माक्स वापरलेच पाहिजे यावर लक्ष ठेऊन आहेत. प्रभागात स्वच्छता आणि जंतुनाशक फवारणी पालिकेच्या माध्यमातून ते करून घेत असून एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शिवसेनेने विश्वास टाकल्याने जनतेची सेवा करण्याची संधी मिळते माजी नगसेवक वसंत भगत शिवसेनेने विश्वास टाकल्याने जनतेची सेवा करण्याची संधी मिळते माजी नगसेवक वसंत भगत  Reviewed by News1 Marathi on November 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads