Header AD

महावितरणचा शहरी भागात 'एक दिवस,दहा रोहित्र' उपक्रम देखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित विजेचा प्रयत्नकल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  देखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित वीज पुरवठा तसेच ग्राहकांशी संवाद या उद्देशाने कल्याण परिमंडलात 'एक गाव, एक दिवस' हा उपक्रम सुरु झाला आहे. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या पुढाकारातून या उपक्रमांतर्गत शहरी भागात 'एक दिवस, दहा रोहित्रे' ही संकल्पना राबविण्यास १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. यात प्रत्येक उपविभागात दर आठवड्याला दहा रोहित्रांची निवड करून अधिक मनुष्यबळाच्या मदतीने एका दिवसात या रोहित्रांच्या देखभाल दुरुस्तीची सर्व कामे केली जात आहेत. यातून संबंधित रोहित्रावरील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा होण्यास मदत मिळेल.


कल्याण परिमंडलांतर्गत पालघर व ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 'एक गावएक दिवसउपक्रमातून वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसह नवीन वीजजोडणी व वीजबिलांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येते. या उपक्रमाचा शहरी वीज ग्राहकांनाही लाभ मिळावाया हेतूने यात आता 'एक दिवसदहा रोहित्रया संकल्पनेची भर टाकण्यात आली आहे. यात रोहित्रातील तेलाची पातळी तसेच अर्थिंग तपासणेपिन व डिस्क इन्सुलेटर बदलणेवितरण पेट्यांची आवश्यक दुरुस्ती व स्वच्छताकिटकॅट बदलणेअडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या व वेली दूर करणे याशिवाय आवश्यक त्या ठिकाणी तारा सरळ करणे व तारांमध्ये स्पेसर्स बसविणे आदी कामे सुरु आहेत. या उपक्रमात शहरी भागातील सर्वच वीज वितरण रोहित्रांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून संबंधित रोहित्रांवरील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळण्यास मोलाची मदत मिळेल.  


कल्याणडोंबिवलीउल्हासनगरवसईविरारबोईसरअंबरनाथबदलापूरपालघरसह परिमंडलातील सर्वच शहरी भागात हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत कल्याण पश्चिमेत सुरु असलेल्या कामांची नुकतीच पाहणी करून मुख्य अभियंता अग्रवाल यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्य अभियंता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते सुनील काकडेसिद्धार्थ तावडेराजेशसिंग चव्हाण व किरण नगांवकर यांच्या टीमकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

महावितरणचा शहरी भागात 'एक दिवस,दहा रोहित्र' उपक्रम देखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित विजेचा प्रयत्न महावितरणचा शहरी भागात 'एक दिवस,दहा रोहित्र' उपक्रम देखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित विजेचा प्रयत्न Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महिला दिना निमित्त मुंबई ते खंडाळ्या दरम्यान ऑल - वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन

■मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील एचपीसीएलच्या नवीन चार्जिंग स्टेशनला दिली भेट ... मुंबई, ८ मार्च २०२१ :  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एमजी मो...

Post AD

home ads