भिवंडी तालुक्यातील वापे गावातील शेतकऱ्याचे भाताचे भारे आगीत जळून खाक
भिवंडी ,प्रतिनिधी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेतीच पीक घेतल जात.भाताच्या भाऱ्यांना आग लागून शेतकऱ्यांच आर्थिक नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्या असताना तालुक्यातील वापे येथील शेतकरी नूतन पाटील यांनी शेतात ठेवलेल्या ६५० भाताच्या भाऱ्यांना अचानक आग लागल्याने त्यांच मोठ आर्थिक नुकसान झाले आहे.
सदर घटना ही शनिवारी दुपारी वापे ग्रामपंचायत परिसरात गावाबाहेर असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात ठेवलेल्या भाताच्या भाऱ्याना अचानक आग लागल्याने ६५० भारे जळून खाक झाले आहेत. या आगीमध्ये अंदाजे अडीच लाख रुपये पर्यत नुकसान झाले असल्याची महिती शेतकरी नूतन पाटील यांनी दिली आहे.सदर या घटनेचा पंचनामा झाला असुन नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी पाटील करत आहेत.
तालुक्यातील बहुतांशी शेतकरी वर्षातुन एकच भाताच पीक घेऊन आपल उदर निर्वाह करत असतात.तसेच यावर्षी अतिवृष्टी व करोना या दुहेरी संकटामुळे शेतकरी अगोदर पासून आर्थिक संकटात सापडला असताना वर्षभर मेहनत करून हातातोंडाशी आलेलं पीक अस जळून खाक झाला असल्याने शेतकरी नूतन पाटील यांच्यावर मोठ आर्थिक संकट कोसळलं आहे.
भिवंडी तालुक्यातील वापे गावातील शेतकऱ्याचे भाताचे भारे आगीत जळून खाक
Reviewed by News1 Marathi
on
November 30, 2020
Rating:

Post a Comment