खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन
■जी.एन.पी. मॉल ते पेंढारकर कॉलेज पर्यंत ३.८६ कोटीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन खासदार निधीतून सी.सी. टीव्ही कॅमेराचे लोकार्पण...
डोंबिवली | शंकर जाधव : कल्याण डोंबिवली मधील विविध विकासकामांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. डोंबिवली क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा असणारा रस्ता म्हणजे कल्याण शीळ रस्त्यावरील सुयोग हॉटेल समोरील रस्ता जी. एन. पी. मॉल ते पेंढारकर कॉलेजपर्यंत सुमारे ३ कोटी ८६ लाख निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे कामाचे भूमिपूजन सोहळा करण्यात आला.
सदर रस्ता हा सांस्कृतिक डोंबिवली शहरात प्रवेश करण्याकारीतेचा मुख्य रस्ता आहे. परंतु गेली कित्येक वर्ष सदर रस्ता डांबरीकरण असल्यामुळे पावसाळ्यामध्ये रस्त्यांची अवस्था दयनीय असायची. हे लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा करून सदर रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे रुपये ३.८६ कोटी मंजूर करून आणले. तसेच यावेळी संबधित कंत्राटदाराला काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याचे आदेश देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.
कल्याण डोंबिवली मनपा मार्फत कल्याण स्मार्ट सिटी या प्रकल्पामध्ये
यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर विनिता राणे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, विधानसभा क्षेत्रप्रमुख एकनाथ पाटील, उपतालुका प्रमुख बंडू पाटील, विधानसभा संघटक कविता गावंड, तात्या माने, महानगरप्

Post a Comment