दिव्यातील आंबेडकरवादी महिला रिक्षाचालक मालक शितल बनसोडे यांचा शेकडो कार्यकर्त्यां सह आरपीआय (आठवले) पक्षात प्रवेश
ठाणे , प्रतिनिधी : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदास आठवले राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या आदेशाने दिवा येथे राहणारी आंबेडकरवादी महिला रिक्षा चालक मालक शितल बनसोडे यांच्यावर झालेल्या अन्याया संदर्भात रिपब्लिकन पक्षाकडे मदत मागितलं होती. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तत्काळ ठाणे पोलीस आयुक्तांना फोन करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार शितल बनसोडे व सहकारी शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते प्रोत्साहित होवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला व शितल बनसोडे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महिला )आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ती देण्याचा ठराव दयाल बहादुरे राष्ट्रीय सचिव ,रामभाऊ तायडे ठाणे जिल्हाध्यक्ष ,संजय बोर्डे महाराष्ट्र सेक्रेटरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी शेकडो महिला पुरुषांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच भीम फाउंडेशन रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विनोद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे या प्रवेशा नंतर कार्यकर्त्यांन मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे असे कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment