Header AD

पेटीएम मॉलचा दिवाळी विशेष महा शॉपिंग फेस्टिवलमुंबई, ३ नोव्हेंबर २०२० : पेटीएम मॉलने ३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान दोन आठवड्यांच्या दिवाळी स्पेशल महा शॉपिंग फेस्टिवलची घोषणा केली आहे. या उत्सवाच्या हंगामात पेटीएम मॉलने ५००० पेक्षा जास्त ब्रँड आणि अग्रगण्य बँकांसोबत करार केला आहे. जेणेकरून ग्राहाकांना १० हजारांपेक्षा जास्त उत्पादनांवर उत्कृष्ट डिल्स आणि सवलती देता येतील. कंपनीने सिटीबँक आणि आयसीआयसीआय बँकेशी भागीदारी केली असून याद्वारे ३,००० पर्यंतच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डच्या पेमेंटसाठी १० टक्के कॅशबॅक ऑफर दिली जाईल. आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना ही ऑफऱ् ईएमआय व्यवहारांवरदेखील मिळेल.


या सेलमध्ये सॅमसंग, विवो, ओपो आणि इतर स्मार्टफोन ४,४९९ रुपयांच्या किंमतीपासून सुरू आहेत. तसेच ५,००० रुपयांपर्यंत १० टक्के कॅशबॅक ऑफरदेखील आहे. ब्रँडने १२ महिने नो-कॉस्ट ईएमआयसह ४००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसदेखील ऑफर केला आहे. लिनोवो, एचपी, डेल आणि इतर बेस्ट सेलिंग कंपन्यांचे लॅपटॉप २०,४१५ रुपयांना असून त्यावर ५,०००पर्यंत ५ टक्के कॅशबॅक ऑफर आहे. पेटीएम मॉलवर सर्व लॅपटॉपसाठी ९ महिने नो-कॉस्ट ईएमआयसह ५ टक्के कॅशबॅक ऑफरदेखील उपलब्ध आहे.


तसेच अॅपेरेल, फूटवेअर आणि अॅसेसरीजमध्ये २ लाख स्टाइल्स असून यावर ५०% सवलत देण्यात आली आहे. अॅपल, गारमिन आणि इतर स्मार्टवॉचवर ५,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. पुमा, जॉकी, लेव्हीजसारखे ब्रँडही १८९ रुपयांपासून उपलब्ध आहेत. कंपनी पर्सनल ग्रुमिंग उत्पादने, हेडफोन्स, स्पीकर्स, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, पॉवर बँक इत्यादीवर १५ टक्के कॅशबॅक देत आहे. दिवाळी उत्सवाचा भाग म्हणून होम अँड किचन प्रॉडक्टवर पेटीएम मॉल ३० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ऑफर देत आहे.


पेटीएम मॉलचे सीओओ अभिषेक राजन म्हणाले, 'या दिवाळीला आमच्या लाखो ग्राहकांना उत्कृष्ट डील आणि सवलती मिळाव्यात, अशी आशा आहे. जेणेकरून सण साजरा करताना व सणाचा उत्साह वाढताना आमच्या यूझर्सना बजेटची चिंता सतावणार नाही. या हंगामात युनिक ऑफर्स देण्यासाठी देशातील शीर्षस्थ बँक आणि ब्रँडसोबत भागीदारी करताना आम्हाला अधिक आनंद होत आहे.'


पेटीएम मॉलचा दिवाळी विशेष महा शॉपिंग फेस्टिवल पेटीएम मॉलचा दिवाळी विशेष महा शॉपिंग फेस्टिवल Reviewed by News1 Marathi on November 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads