Header AD

दिवाळीनिमित्त गरजूंना साहित्याचे वाटप तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनचा उपक्रम
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  वंचित आणि दुर्लक्षित समाजघटकांना देखील दिवाळीचा आनंद घेता यावा यांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कल्याणच्या तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनच्या माध्यमाने उतनेवाडीआडिवलीबेलकरपाडादहिवली येथे दिवाळीनिमित्त कपडेफराळ आणि घरोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळीं चेतन म्हामुणकरतुषार वारंगस्वप्नील शिरसाठभुषण राजेशिर्केमंगेश तिवारीअविनाश पाटीलप्रणिल मिसळेगीतेश कोटपकरनरेंद्र शुक्ला,भक्ती कुंभार उपस्थित होते.


तिरंगा जागृती विचार मंचच्या माध्यमाने जमा झालेले कपडे यावेळीं गरजूंना वाटण्यात आले. त्याचबरोबर बेलकरपाडा येथील वीटभट्टीवर घरोपयोगी साहित्य देण्यात आले. सिध्दीविनायक ॲनेक्स सोसायटीने साहित्य देण्यासाठी मदत केली. त्याचबरोबर टीम परिवर्तनच्या मदतीने युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था दहिवली येथे गीता भास्कर यांच्या माध्यमाने मुलांना डिजिटल अभ्यासवर्ग सुरू करण्यासाठी एक नवीन कम्प्युटर देण्यात आला. याचं ठिकाणी जय फाउंडेशनच्या जय शृंगारपुरे यांनी दिलेल्या खेळण्याच्या मदतीने लहान मुलांसाठी टॉय बँक सुरू करण्यात आली.


दिवाळीचा सण आपल्या समाजातील दुर्लक्षित घटकांसोबत साजरा करण्यासाठी साहित्य संकलन मोहीमेत सहकार्य करणाऱ्या कल्याणकर नागरिकांचे चेतन म्हामुणकर यांनी यावेळीं आभार व्यक्त केले. साहित्य वाटप करण्यासाठी सोमनाथ राऊत यांचे यावेळीं विशेष सहकार्य मिळाले तसेच अजित कासारप्रथमेश सुर्यवंशीशुभम निकमसुरज सुरोसेअंगजबिराजित यांनी मोहिमेचे नियोजन पाहिले.

दिवाळीनिमित्त गरजूंना साहित्याचे वाटप तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनचा उपक्रम दिवाळीनिमित्त गरजूंना साहित्याचे वाटप तिरंगा जागृती विचार मंच आणि टीम परिवर्तनचा उपक्रम Reviewed by News1 Marathi on November 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads