जय हनुमान युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ भोपरतर्फे स्वच्छता अभियान
कल्याण , कुणाल म्हात्रे : सध्या स्वच्छतेचा जागर सर्वत्रच होत आहे. जेथे नांदते स्वच्छता तेथे नांदते आरोग्य असेही म्हंटले जाते. हेच ब्रीद डोळ्यासमोर ठेवून जय हनुमान युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ भोपरतर्फे भोपर गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
रविवारी ८ नोव्हेंबर रोजी भोपर गाव स्वच्छतेसाठी स्व. मोहन दामू माळी चौक येथून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 'आमचं गाव आमची जबाबदारी' हा कर्तव्याचा नाराही देण्यात आला. जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे मावळे, प्रतिष्ठानचे प्रमुख सल्लागार व भोपरचे सुपुत्र स्व. मोहन दामू माळी व निष्ठावंत शिवसैनिक स्व. सोमनाथ परशुराम माळी यांच्या स्वप्नातले भोपर गाव साकरण्यासाठी सर्व झटत आहेत. यावेळी आमदार राजु पाटील, माजी सभापती रमेश म्हात्रे उपस्थित होते.
अर्जुन चौधरी, गजानन पाटील, जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष एकनाथ पाटील, दीपक जाधव, दयानंद म्हात्रे, गंगाराम पाटील, मुकेश पाटील, सुनील पाटील, गजानन देसले व जय हनुमान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश जयराम पाटील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मंडळी भोपर यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी यांनी प्रयत्न केले.

Post a Comment