Header AD

रिक्षा टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनेच्या पाठपुराव्याला यश


■परिवहन विभागाने मंञालयात बोलावली सयुंक्तिक बैठक...


कल्याण, कुणाल म्हात्रे  :  रिक्षा टॅक्सी चालकांचे अनेक वर्ष शासन दरबारी रिक्षा टॅक्सी चालकांचे खुले रिक्षा परवाने बंद करणे, कल्याणकारी महामंडळ अमलबजावणी, प्रलंबित भाडे दरवाढ व इतर मागण्या तात्काळ सोडविण्या संदर्भात मंञलयात परिवहन मंञी अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे व मुबंई एम.एम.आर.डी.ए. क्षेञातील रिक्षा टॅक्सी संघटना प्रतिनिधी यांची सयुंक्तिक बैठक शुक्रवारी बोलावली होती.


रिक्षा टॅक्सी संघटनाचां सात्तत्याने केलेला पाठपुरावा याची दखल घेऊन खुद्द परिवहन मंञी यांनी परिवहन विभागास संयुक्तिक बैठक आयोजनाचे निर्देश दिले होते. यामुळे रिक्षा टॅक्सी चालकांच्या काही प्रमुख मागण्या लवकरच मान्य होतील असा विश्वास संघटनेच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे. बैठकित मुबंई प्रमुख रिक्षा टॅक्सी संघटनेचे नेते व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी प्रलंबित मागण्या सोबतच दहा वर्ष जुनी रिक्षा परवान्यावर बदली करण्याची परवानगी द्यावी ही  मागणी केली.


 या बैठकीस कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकरएकनाथ पिगंळेसंतोष नवलेऋषीकेश पाटीलरामदास करकरेशेळकेअकुंश म्हाञेउदय शेट्टीगजानन पाटीलअर्जुन माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रिक्षा टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनेच्या पाठपुराव्याला यश रिक्षा टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात संघटनेच्या पाठपुराव्याला यश Reviewed by News1 Marathi on November 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads