Header AD

कल्याण डोंबिवलीत १६० नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

 

■५०,६३३ एकूण रुग्ण तर १०११ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १०१ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १६० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


आजच्या या १६० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,६३३ झाली आहे. यामध्ये १४१६ रुग्ण उपचार घेत असून ४,२०६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १६० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३४कल्याण प – ४१डोंबिवली पूर्व ५३,  डोंबिवली प- २५मांडा टिटवाळा – , तर मोहना येथील ५ रूग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ३० रुग्ण टाटा आमंत्रामधून७ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून४ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून तर इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत १६० नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत १६० नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on November 05, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads