Header AD

सरस ब्युटी प्ल्यानेट अकॅडमीच्या च्या वतीने ब्राईडल मेकप स्पर्धा संपन्न




भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यातील मानकोली नाका येथे सरस भोलेनाथ पाटील यांच्या नुकत्याच सरस ब्युटी प्ल्यानेट अकॅडमी सेरेमणीचे उदघाटन करण्यात आले होते. उदघाटन झाल्याबरोबर लगेच दुसऱ्याच दिवशी सरस ब्युटी प्ल्यानेट अकॅडमीच्या वतीने ब्राईडल मेकप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत १० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला रोख रक्कम, ट्रॅफि ,सर्टिफिकेट  इत्यादी बक्षीसे ठेवण्यात आली होती. सदर स्पर्धेत बाळकुम, दिवा, मोगरपाडा,खिडकाळी, डोंबिवली, गुंदवली, पिंपळास,गावातील स्पर्धक सहभागी झाले होते. 


या स्पर्धेला प्रमुख पाहुणे शिवसेना भिवंडी तालुका सचिव राजेंद्र काबाडी, कांबे जिल्हा परिषद गटाचे संपर्क सचिव राजेंद्र पाटील, मीनल पाटील  (मुंबई) ,व सुहास जाधव उल्हासनगर,(सेमिनार ऑर्गनायजर)आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत प्रथम येण्याचा मान संजना भोईर (बाळकुम) द्वितीय क्रमांक वनश्री ठाकूर (मोगरपाडा ) तृतीय क्रमांक आचल ठाकूर (खिडकाळी),  हर्षला पाटील ( गुंदवली),व चतुर्थ क्रमांक कोमल म्हात्रे (दिवा) यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम,  ट्रॉफी, सर्टिफिकेट इत्यादी बक्षिसे देण्यात आली. 
सरस ब्युटी प्ल्यानेट अकॅडमीच्या च्या वतीने ब्राईडल मेकप स्पर्धा संपन्न  सरस ब्युटी प्ल्यानेट अकॅडमीच्या च्या वतीने ब्राईडल मेकप स्पर्धा संपन्न Reviewed by News1 Marathi on November 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads