Header AD

ज्येष्ठ पत्रकार किशोर पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना मदत
डोंबिवली , शंकर जाधव : कोरोनाच्या काळात सर्वांचे हाल झाले आहे.त्यामुळे आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत ज्येष्ठ पत्रकार किशोर पगारे यांनी डोंबिवली पूर्वेकडील डोंबिवली जिमखाना जवळील जननी आशिष बाल संगोपन केंद्र येथे भेट देत अनाथ मुलांना आवश्यक वस्तू व भाजी-फळे दिली. तर बाजीप्रभू चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. डोंबिवली येथील पत्रकार कक्षात मराठी पत्रकारितेचे जनक स्व.बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतीमेस,स्व.श्रीकांत टोळ आणि स्व.विकास काटदरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आशीर्वाद घेतले.


किशोर पागरे हे उत्तम नकलाकार असून त्यांच्या सुरेल आवाजाने ते सर्वांचे चाहेते झाले आहे.इलेट्रोनिक मिडियात काम करत असताना पगारे यांनी निर्भीड पत्रकार असल्याचे दाखवून दिले आहे.राजकीय नेतेमंडळीचेही ते आवडते पत्रकार आहे. पत्रकारिता करत असतान समाजसेवेचा वास घेणारे पगारे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक गोर-गरीब जनतेच्या अन्यायाला वाचा फोडली. त्यांच्या पत्रकारितेची दाखल घेत त्यांना अनेक सामाजिक संस्थांनी पुरस्कार घेऊन गौरविले देखील आहे.डोंबिवली पत्रकार कक्षात सर्व पत्रकारांनी पागरे यांच्या वाढदिवसाला केके कापून आनंद व्यक्त केला

ज्येष्ठ पत्रकार किशोर पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना मदत ज्येष्ठ पत्रकार किशोर पगारे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना मदत Reviewed by News1 Marathi on November 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads