Header AD

अखिल भारतीय सेनेच्या ठाणे जिल्हा ध्यक्षपदी राजेश दाखीनकर यांची पुनर्नियुक्ती




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  अखिल भारतीय सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी राजेश दाखीनकर यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र अखिल भारतीय सेना राष्ट्रीय सरचिटणीस आशा गवळी यांच्याहस्ते देण्यात आले.येत्या काही महिन्यांत कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका असून या निवडणुकांच्या दृष्टीने दाखीनकर यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने अखिल भारतीय सेना पक्षप्रमुख  माजी आमदार अरुण गवळी यांच्या आदेशाने महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजेश कदम यांच्या नेतृत्वात  दाखीनकर यांची अखिल भारतीय सेना ठाणे जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


याआधीदेखील दाखीनकर यांनी पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नागरिकांचे अनेक प्रश्न, तसेच समस्या सोडविल्या असून अनेक नैसर्गिक आपत्तीमध्ये महराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे पक्षसंघटना वाढीसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे त्यांची ठाणे जिल्हाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.  पक्षाने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करुन पक्षबांधणी पाया मजबूत करून आगामी कल्याण  डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर निवडणुकीत पक्षाचे उमेदवार देऊन पक्षाचे नगरसेवक निवडून आणणार असल्याने दाखीनकर यांनी यावेळी सांगितले.

अखिल भारतीय सेनेच्या ठाणे जिल्हा ध्यक्षपदी राजेश दाखीनकर यांची पुनर्नियुक्ती अखिल भारतीय सेनेच्या ठाणे जिल्हा ध्यक्षपदी राजेश दाखीनकर यांची पुनर्नियुक्ती Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads