Header AD

भिवंडीत कोरोना मुळे मृत्यु झालेल्या पोलिसाच्या कुटुंबियांना सहकारी पोलिसांनी केली सव्वा लाखाची मदत




भिवंडी , प्रतिनिधी   :  कोरोना संसर्ग वाढत असताना लागू केलेल्या लॉक डाऊन काळात नागरीकांना घरातच बसवून ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आली होती .त्यासाठी पोलीस जवान २४ तास नागरीकांच्या सेवेसाठी रस्त्यावर तैनात होते .त्यामुळे असंख्य पोलीस अधिकारी कर्मचारी हे सुध्दा कोरोना बाधित झाले .भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्यात नेमणुकीवर असलेले पोलीस शिपाई राजेश सुभाष देसले वय ४८ वर्षे हे कर्तव्य बजावत असताना कोरोना बाधित झाले त्यांचे वर उपचार सुरू असताना दि.१३ ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.


त्यांच्या कुटुंबियांना शासन स्तरावरील ५० लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार असला तरी आपल्या तील एक सहकारी कर्मचारी मृत्यु झाल्याने त्याच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी भोईवाडा पोलीस ठाणे मधील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः कडील जमा केलेली रोख रक्कम एक लाख पंचवीस हजार रूपये त्यांच्या विधवा पत्नी सरीता राजेश देसले यांना भिवंडी परिमंडळ पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.या प्रसंगी भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस.ए. इंदलकर,पोलोस निरीक्षक नरेश पवार उपस्थित होते .
भिवंडीत कोरोना मुळे मृत्यु झालेल्या पोलिसाच्या कुटुंबियांना सहकारी पोलिसांनी केली सव्वा लाखाची मदत भिवंडीत कोरोना मुळे मृत्यु झालेल्या पोलिसाच्या कुटुंबियांना सहकारी पोलिसांनी केली सव्वा लाखाची मदत Reviewed by News1 Marathi on November 11, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

१.२५लाख वितरकांना कमाईची संधी देणार 'इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१' ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणार आयोजन

मुंबई, २ ऑगस्ट २०२१:  भारतीय उद्योग क्षेत्रातील लाखो लोकांना कोव्हिड-१९ महामारीमुळे नोकरीवरून कपात आणि आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. य...

Post AD

home ads